आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्मात्यांचा निर्णय:व्हीएफएक्सच्या मदतीने पूर्ण केला जाईल ऋषी कपूरचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन',  फक्त चार दिवसांची शूटिंग होती बाकी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्मात्यांनी चित्रपट बंद होणार नसल्याचे अलीकडेच स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी 30 एप्रिल रोजी निधन झाले. ते गेल्या दोन वर्षांपासून  ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. गेल्या वर्षी अमेरिकेत बराच काळ उपचार घेतल्यानंतर ते सप्टेंबर महिन्यात मुंबईला परतले होते. त्यानंतर ते 'शर्माजी नामकीन' या चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन करणार होते, ज्याचे डिसेंबर महिन्यात चित्रीकरणही सुरु झाले होते. चित्रपटात ते मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या निधनाने आता हा चित्रपट बंद होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु निर्मात्यांनी चित्रपट बंद होणार नसल्याचे अलीकडेच स्पष्ट केले आहे. 

व्हीएफएक्सला मदत घेणार निर्मातेः वास्तविक, ऋषी यांचे बरेच शूटिंग पूर्ण झाले होते. फक्त काही सीन्सच बाकी होते. निर्माता हनी त्रेहान यांनी एका मुलाखतीत हा चित्रपट पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.  ते म्हणाले की दिग्दर्शक हितेश भाटिया आणि क्रू यांच्यावर लीड अ‍ॅक्टरशिवाय चित्रपट पूर्ण करण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत आम्ही प्रगत तंत्रज्ञान, व्हीएफएक्स आणि काही खास तंत्रांच्या मदतीने गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करू. आम्हाला हे कसे करता येईल यासंदर्भात काही व्हीएफएक्स स्टुडिओशी बोलणी सुरु आहेत. 

केवळ चार दिवसांची शूटिंग बाकी राहिली होती : त्रेहान पुढे म्हणाले, आम्ही जानेवारीपर्यंत दिल्लीत चित्रपटाचे बरेच चित्रीकरण पूर्ण केले होते. केवळ चार दिवसांचे वेळापत्रक बाकी होते. ऋषीजी रुपेरी पडद्यावरचे एक दिग्गज होते, म्हणूनच हा चित्रपट त्यांना समर्पित आहे आणि आम्ही त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच हा चित्रपट प्रदर्शित करू. मला आमचे इतर निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांचे मनापासून आभार मानायचे आहेत जे आम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक आधार देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...