आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश देशमुखचे लक्ष वेधून घेणारे ट्विट:अभिनेता रितेश देशमुखने सांगितले जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे भारताशी अनोखे कनेक्शन

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रितेशचे हे ट्विट मजेशीर असून त्यावर सगळ्यांच्याच गमतीदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

सध्या भारतात बिहार निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. बॉलिवूडकरांनीही या निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या सगळ्यातच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचे अमेरिका आणि बिहार या दोन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले ट्विट चांगलेच गाजत आहे. रितेशने चक्क अमेरिकेच्या निवडणुकीचे आणि जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे भारताशी असलेले अनोखे कनेक्शन समोर आणले आहे. विशेष म्हणजे त्याचे हे ट्विट मजेशीर असून त्यावर सगळ्यांच्याच गमतीदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

रितेशचे ट्विट...

अमेरिकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत जो बायडन अमेरिकेचे 46वे अध्यक्ष बनले आहेत. तर, मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची उप राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. अमेरिकेत या निवडणुकीचा आनंद साजरा केला जात असतानाच, भारतातही कमला हॅरिस यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे

अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांना 279 इलेक्टोरल मते मिळाली, तर ट्रम्प यांना अवघी 214 इलेक्टोरल मते मिळाली. जो बायडन यांच्याबरोबर कमला हॅरिस देखील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून त्यांच्या नावे विक्रम प्रस्थापित झाला आहे.

5 लाख भारतीयांना नागरिकत्व देणार अमेरिका
वैध कागदपत्रांशिवाय राहत असलेल्या स्थलांतरित नागरिकांसाठी बायडेन प्रशासन एक योजना सुरू करणार आहे. अमेरिकेत एक कोटीवर लोक असे आहेत, ज्यांना तांत्रिक कारणांमुळे तेथील नागरिकत्व मिळवू शकलेले नाहीत. त्यात 5 लाख भारतीय आहेत. बायडेन प्रशासन दरवर्षी 95 हजार निर्वासितांनाही आश्रय देईल. ट्रम्प सरकारचा त्याला तीव्र विरोध होता. त्यामुळे निवडणुकीत स्थलांतरितांचा ओढा बायडेन यांच्याकडे राहिला.

बातम्या आणखी आहेत...