आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याचे स्पष्टीकरण:'शेरशाह'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा मित्र सनीची भूमिका वठवणारा अभिनेता साहिद वैद आपल्या शब्दावरुन पलटला, म्हणाला - 'शेरशाह' साइन करायलाच नको होता, असे मी म्हटलेच नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साहिलने दिले स्पष्टीकरण

'शेरशाह' या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत असलेल्या सिद्धार्थ मल्होत्राच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता साहिल वैद आपल्या कामावर खूश नाहीये. मी हा चित्रपट साइन करायलाच नको होता असे विधान अलीकडेच एका मुलाखतीत साहिलने केले होते. पण आता मात्र तो आपल्या शब्दांवरुन पलटला आहे. मी असे म्हणालोच नाही, मी जे बोललो ते चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण आता साहिलने दिले आहे.

साहिलने दिले स्पष्टीकरण

साहिलने एका मुलाखतीत म्हटले आहे, 'शेरशाह'चा मी एक भाग असल्याचा मला आनंद आहे. त्या आर्टिकलमध्ये खंत, पश्चातापर वैगेरे शब्द का वापरले गेले आहेत, हे मला माहित नाही. 'शेरशाह' मध्ये काम करून मला पश्चात्ताप झाला आहे, असे मी कधीही म्हणालेलो नाही. असा विचार देखील मी करु शकत नाही. मी म्हणालो होतो की, जेव्हा मला चित्रपटात मित्राची भूमिका ऑफर झाली तेव्हा भूमिका लहान असल्याने मी ती करावी की नाही, याबाबत गोंधळलो होतो. मी एका आर्मी कुटुंबातून आहे आणि चित्रपटात मला एका सोल्जरची भूमिका साकारायची इच्छा होती. पण मी कधीच असे म्हटले नाही की, मला शेरशाह हा चित्रपट साइन करायला नको होता. या वृत्ताने धर्मा प्रॉडक्शनच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मला अनेकांनी फोन करुन तू असे का केले? अशी विचारणा केली आहे. सध्या मला लोकांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.'

यापूर्वी साहिल काय म्हणाला होता?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत साहिल म्हणाला होता, 'मला या चित्रपटात युद्धाच्या सीनमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. पण दिग्दर्शकांचे म्हणणे होते की, मी मित्र सनीच्या भूमिकेसाठीच ठिक आहे. मी धर्मा प्रॉडक्शनचा आभारी आहे की, त्यांनी मला हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्ये संधी दिली. त्यामुळे मी शेरशाह हा चित्रपट त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी केला.'

पुढे साहिल म्हणाला होता, 'चित्रपट खूप हीट झाला असला तरीही हे खूपच दुःखद आहे की, प्रेक्षकांनी चित्रपटातील सपोर्टिंग कास्टकडे दुर्लक्ष केले आहे. चित्रपटात अनेक कलाकारांनी आपला इगो बाजूला ठेवून छोट्या भूमिका साकारल्या आहेत. कारण त्यांना कामातून शहिद कॅप्टन विक्रम बत्रा यांना श्रद्धांजली द्यायची होती. याच कारणाने मी देखील चित्रपट साइन केला होता. पण मला आता जाणवतंय की मी हा चित्रपट साइन करायलाच नको होता. मी चित्रपटात काय काम केले आहे याबद्दलही लोक बोललेले नाहीत.'

कॅप्टन विक्रम बत्रांच्या आयुष्यावर बेतला आहे चित्रपट
'शेरशाह' हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असून विष्णू वर्धन याचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा तर कियारा आडवाणीने त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमाची व्यक्तिरेखा साकारली आहे. कारगिल युद्धाचे रिअल हिरो कॅप्टन विक्रम बत्रा या युद्धात शहीद झाले होते. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...