आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:अभिनेता साई गुंडेवारचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन, 'रॉक ऑन', 'पीके', 'बाजार' या चित्रपटांमध्ये उमटवली होती छाप 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक गाजलेल्या टेलिव्हिजन शोजमध्ये साईप्रसादने काम केले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता साईप्रसाद गुंडेवारचे अमेरिकेत उपचारादरम्यान निधन झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो 'ग्लायोब्लास्टोमा'(ब्रेन कॅन्सरने) त्रस्त होता. त्याचे 22 फेब्रुवारी 2019 रोजी ब्रेन कॅन्सरचे ऑपरेशन अमेरिकेतील लॉस एंजिलिसमधील हॉस्पिटलमध्ये झाले होते. तेव्हापासून तो हॉस्पिटलमध्येच उपचार घेत होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार 10 मे रोजी सकाळी 7.30 वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

साई गुंडेवारने एम टीव्हीच्या Splitsvilla Season 4, स्टार प्लसवरील Survivor तसेच अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T.,  Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies,The Card मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्याने 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके', 'बाजार' इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये त्याने विविध भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या 'ए डॉट कॉम मॉम' या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.  

फॅशन डिझायनर सपना अमीनसोबत 2015 मध्ये त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई शुभांगी, राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. अतिशय तरुण वयात त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...