आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:'भूत पुलिस'च्या फायनल शूटसाठी अर्जुन आणि सैफ संपूर्ण टीमसह जैसलमेरला पोहोचले, उर्वरित 25% चित्रपटाचे चित्रीकरण येथे होणार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटोमध्ये अर्जुन आणि सैफ 'भूत पुलिस'च्या कास्ट आणि क्रूसोबत दिसत आहेत.

अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर त्यांच्या आगामी ‘भूत पुलिस’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यातील चित्रीकरणासाठी जैसलमेरला पोहोचले आहेत. गुरुवारी अर्जुनने 'भूत पुलिस' च्या संपूर्ण टीमसोबतचा फ्लाइटमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोमध्ये अर्जुन आणि सैफ 'भूत पुलिस'च्या कास्ट आणि क्रूसोबत दिसत आहेत.

उर्वरित 25% चित्रपटाचे चित्रीकरण जैसलमेरमध्ये होणार

रिपोर्टनुसार 'भूत पुलिस' या चित्रपटाचे शूटिंग जवळपास 75% पूर्ण झाले आहे. लॉकडाउननंतर या चित्रपटाचे चित्रीकरण धर्मशाला आणि डलहौसीमध्ये करण्यात आले. आता उर्वरित 25% चित्रपटाचे चित्रीकरण जैसलमेरमध्ये होणार आहे. या चित्रपटाच्या युनिटमधील 180 लोक एका बोइंग विमानाने जैसलमेरमध्ये दाखल झाले आहेत. संपूर्ण युनिट कुलधरा रोडवरील एका खासगी हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' चित्रपटाचे शूटिंगही जैसलमेरमध्ये सुरू आहे. या चित्रपटाचे संपूर्ण युनिट ब-याच दिवसांपासून जैसलमेरमध्ये आहे.

सैफ-अर्जुन व्यतिरिक्त यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस, जावेद जाफरी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रमेश तोरानी आणि अक्षय पुरी या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पवन कृपलानी चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...