आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात मदतीचा हात:सलमान खानने पनवेलच्या फार्महाऊसमधून गरीबांसाठी बैलगाडी-ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाठवले किराणा सामान 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमान खान पनवेलच्या आसपासच्या गावात राहणा-या गरिबांसाठी किराणा सामान पाठवले आहे.

लॉकडाऊनमुळे अभिनेता सलमान खान आपल्या मुंबईच्या घरी नव्हे तर पनवेलस्थित त्याच्या फार्महाऊसमध्ये अडकला आहे. येथे तो  काही कामाच्या संदर्भात गेला परंतु त्यानंतर लगेचच लॉकडाऊन जाहीर झाले आणि तो त्याच्या काही फॅमिली मेंबर्ससोबत येथे अडाले. सलमानने यापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात तो लोकांना घरीच राहून लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. आता त्याने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो पनवेलच्या आसपासच्या गावात राहणा-या गरिबांसाठी किराणा सामान पाठवताना दिसतोय.

जॅकलिननेही केली सलमानची मदत : सलमानने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये बैलगाडी, ट्रॅक्टर आणि अन्य गाड्यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत किराणा सामान पोहोचविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्याच्यासोबत यूलिया वंतूर, जॅकलीन फर्नांडिस आणि घरातील अन्य सदस्य दिसून येत आहेत. हा व्हिडिओ शेअर करुन सलमानने साऱ्यांचे आभार मानले आहेत.

सलमानचा मदतीचा ओघ सुरुच : सलमानने आतापर्यंत अनेकांसाठी मदत केली आहे. यापूर्वी त्याने गरजू कामगारांना एक ट्रक भरुन किराणा सामान पुरविले आहे. तसंच आपल्या बीइंग ह्यूमन फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने  फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआयसीई) च्या 25,000 कामगारांच्या खात्यात दोन महिन्यांसाठी 6000 रुपये ट्रान्सफर केले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...