आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीराबाईला भेटला सलमान:रौप्य पदक विजेती मीराबाई चानूची घेतली सलमानने भेट, फोटो शेअर करत म्हणाला - मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीराबाई चानूसोबतची प्रेमळ भेट : सलमान

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूला भेटायचे अनेकांचे स्वप्न आहे. दरम्यान, अनेक सेलेब्स मीराबाई चानूचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपाने अभिनंदन करत आहेत. मीराबाई मात्र अभिनेता सलमान खानची मोठी चाहती असून त्याला भेटायची तिची इच्छा होती. काही मुलाखतींच्या माध्यमातून तिने याबाबत सांगितले देखील आहे. जेव्हा सलमान खानला मीराबाईच्या इच्छेबद्दल समजले तेव्हा त्याने तिची भेट घेण्याचे ठरवले. नुकतीच मीराबाई आणि सलमान यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटोदेखील सलमान खानने शेअर केला आहे.

मीराबाई चानूसोबतची प्रेमळ भेट : सलमान
फोटो शेअर करत सलमान खानने लिहिले, "रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानूसाठी मी खूप आनंदी आहे. तिच्यासोबतची एक प्रेमळ भेट... माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत आहेत," असे कॅप्शन सलमानने फोटोला दिले आहे. या फोटोमध्ये सलमान खानच्या गळ्यात एक शॉल दिसतेय. ही शॉल मीराबाईने या भेटीदरम्यान सलमानला भेट म्हणून दिली आहे. सलमानसोबतच्या भेटीचा आनंद यावेळी मीराबाईच्या चेह-यावर स्पष्ट झळकतोय.

तुमची भेट माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे: मीरा
सलमान खानच्या पोस्टवर कमेंट करताना मीराबाई चानूने लिहिले, "सलमान खान सरांचे खूप खूप आभार. मी तुमची मोठी चाहती आहे आणि तुम्हाला भेटणे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते." यापूर्वी एका मुलाखतीत मीराबाईने सांगितले होते की, ती सलमान खानची मोठी चाहती आहे. ती म्हणाली होती, “सलमान मला खूप आवडतात, त्यांचे बॉडी स्ट्रक्चर मला खूप आवडते.”

सचिन तेंडुलकरनेही मीराबाईची घेतली होती भेट
सलमान खानच्या आधी सचिन तेंडुलकरनेही मीराबाई चानूला भेटून तिचे अभिनंदन केले होते. या भेटीचा फोटो सचिनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.

भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी भारतासाठी पदककमाई केली. तिने महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले.

बातम्या आणखी आहेत...