आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलमान खान स्टारर 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट येत्या 13 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांसह 'पे-पर-व्ह्यू' सर्विसअंतर्गत झी प्लेक्सवर रिलीज होतोय. गेल्या महिन्यात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने चित्रपटाला विना कट थिएटर स्क्रिनिंगसाठी यूए प्रमाणपत्र दिले होते. सेन्सॉर बोर्डाकडून विना कट पास झाल्यानंतर सलमानने स्वतः चित्रपटातील काही सीन्स आणि डायलॉग्सवर कात्री फिरवली आहे. सलमानने चित्रपटावर एकुण 21 कट्स लावले आहेत.
सलमानने चित्रपटातून ड्रग्जचे सेवन दाखवणारे 6 सीन काढून टाकले
चित्रपटातील काही दृश्ये अशी होती, ज्यात एका लहान मुलाला ड्रग्ज घेताना दाखवले होते. असे सुमारे 6 सीन्स निर्मात्यांनी चित्रपटातून काढले आहेत. सेंट्रल बोर्डाकडून यूए प्रमाणपत्र मिळाल्याने हा चित्रपट 12 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले देखील हा चित्रपट आपल्या पालकांसह पाहू शकतात.
पोलिस स्टेशनबाहेरील अजानचा सीनदेखील डिलीट केला
निर्मात्यांनी राधे या चित्रपटातील पोलिस स्टेशनच्या बाहेर अजान देणा-याचा सीनदेखील चित्रपटातून हटवला आहे. सलमान खान स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देतो. त्यामुळे चित्रपटातील एका डायलॉगमध्ये स्वच्छ मुंबई असा उल्लेख होता. तो बदलून त्याने आता स्वच्छ भारत केला आहे. अशाप्रकारे, सलमानने चित्रपटात एकूण 21 कट लावले आहेत.
ओटीटीवर प्रदर्शित होणारा सलमान खानचा पहिला चित्रपट
कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशातील विविध भागातील ठराविक चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांशिवाय हा चित्रपटही ऑनलाइन प्रदर्शित होईल. आतापर्यंत सलमान खानचा कोणताही चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला नाही. अशा परिस्थितीत 'राधे' सलमान खानचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.