आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग डील:सलमान खानने साइन केली आतापर्यंतच सर्वात मोठी डील, 'झी स्टुडिओज'ला 230 कोटींमध्ये विकले 'राधे'चे सर्व अधिकार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीलनुसार सलमानने संपूर्ण चित्रपट ‘झी स्टुडिओज’ला विकला आहे.

अभिनेता सलमान खानने 2020 या वर्षातील सर्वात मोठी डील साइन केल्याचे वृत्त आहे. त्याने आपल्या आगामी ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचे सर्व अधिकार तब्बल 230 कोटींमध्ये ‘झी स्टुडिओज’ला विकले आहेत. कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाची ही आतापर्यंतची सर्वात महागडी डील असल्याचे बोलले जात आहे. या डीलसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून मेकर्स आणि झी यांच्यात बोलणी सुरु होती.

या कथित डीलनुसार सलमानने संपूर्ण चित्रपट ‘झी स्टुडिओज’ला विकला आहे. ज्यामध्ये थिएटरचे अधिकार, ग्लोबल रिलीज, म्युझिक, ओटीटी आणि सॅटेलाईट हक्क पूर्णपणे ‘झी’ कंपनीला देण्यात आले आहेत. ‘झी’ कंपनीनेदेखील त्यांचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे डील असल्याचे म्हटले आहे.

सलमान आणि झी यांच्यातील हा करार दोघांसाठी फायदेशीर ठरु शकतो. कारण सलमानचे चित्रपट चांगला व्यवसाय करतात. सलमानने यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. आता मेकर्स पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. सलमानचा हा चित्रपट 230 कोटींहून अधिक व्यवसाय नक्की करेल, असा विश्वास ‘झी’ कंपनीने व्यक्त केले आहे.

यापूर्वीही सलमानने झीसोबत केल्या अनेक डील
वृत्तानुसार, राधेसाठी झी पूर्वी यशराज फिल्म्ससोबत बोलणी सुरु होती. मात्र काही कारणास्तव ही डील झाली नाही. सलमानने यापूर्वी झी सोबत अनेक डील केल्या आहेत. 'राधे'शिवाय सलमानच्या बॅनरच्या 'कागज'चा ट्रेलरदेखील झीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. 'कागज'मध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. सलमानने यापूर्वी 'रेस 3', 'भारत' आणि 'दबंग 3' साठी झीसोबत डील केली होती.

कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे 'राधे' सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. चित्रपटात सलमानसह जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा हे देखील लीड रोलमध्ये दिसतील. 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' कोरियन फिल्म 'द आउटलॉज'चा हिंदी रिमेक आहे. सलमानने काही दिवसांपूर्वीच 'अंतिम' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यात तो मेहुणा आयुष शर्मासोबत झळकणार आहे. यानंतर मार्चमध्ये सलमान 'टाइगर 3'च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser