आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Actor Sandeep Nahar Suicide Case: Wife Carrying The Dead Body With Her To The Hospitals, Despite Being Declared Dead, Came Home With Her

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता संदीप नाहर आत्महत्या प्रकरण:दोन हॉस्पिटलमध्ये संदीपचे पार्थिव घेऊन गेली होती त्याची पत्नी, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पोलिसांना न कळवता मृतदेह घरी घेऊन गेली

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संदीप नाहरने सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्या प्रकरणात गोरेगाव पोलिसांनी नवीन खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नाहरचे पार्थिव घेऊन त्याची पत्नी कांचन शर्मा दोन हॉस्पिलटमध्ये गेली होती. हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी संदीपला मृत घोषित केल्यानंतर कांचन पोलिसांना माहिती न देता त्याचे पार्थिव घेऊन घरी परतली.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, संदीपने आपल्या खोलीत दार बंद करुन गळफास घेतला होता. जेव्हा त्याच्या पत्नीला याबद्दल समजले, तेव्हा तिने कारपेंटरला बोलावून दार तोडले. संदीपच्या पत्नीसह आणखी दोघांनी मिळून त्याचे पार्थिव पंख्यावरुन खाली उतरवले आणि त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले.

अक्षय कुमार स्टारर 'केसरी' या चित्रपटातही संदीप नाहर झळकला होता.
अक्षय कुमार स्टारर 'केसरी' या चित्रपटातही संदीप नाहर झळकला होता.

कारपेंटरचा जबाब ठरु शकतो महत्त्वाचा

तथापि, आत्महत्या प्रकरणामुळे संदीपला रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. यानंतर त्याला दुसर्‍या रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर कांचनने संदीपचा मृतदेह घरी आणला आणि त्यानंतर पोलिसांना त्याविषयी माहिती दिली असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे, जेणेकरुन मृत्यूचे कारण कळू शकेल. या प्रकरणात खोलीचे दरवाजा उघडणा-या कारपेंटरचा जबाब महत्त्वपूर्ण ठरू शकते. आज पोलिस त्याचा जबाब नोंदवू शकतात.

सुशांतसोबत संदीप नाहर - फाइल फोटो
सुशांतसोबत संदीप नाहर - फाइल फोटो

मृत्यूपूर्वी संदीपने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता
संदीपने आत्महत्या कशी केली हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. डीसीपी विशाल ठाकूर म्हणाले, "संदीपची पत्नी कांचन यांनी संदीपचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्याचे सांगितले. त्यांनी (कांचन) दोन लोकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल.” संदीपच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज दुपारनंतर येऊ शकतो.

संदीपने 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या मित्राची भूमिका वठवली होती. 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. संदीपने मृत्यूपूर्वी सोमवारी संध्याकाळी 9 मिनिटांचा व्हिडिओ आणि सुसाईड नोट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यात त्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले. यात संदीपने सांगितल्यानुसार, तो त्याच्या पत्नीमुळे खूप त्रासात होता आणि त्यामुळेच तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतोय.

संदीपने एम एम धोनी या चित्रपटात सुशांतच्या मित्राची भूमिका साकारली होती.
संदीपने एम एम धोनी या चित्रपटात सुशांतच्या मित्राची भूमिका साकारली होती.

संदीपने सुसाइड नोटमध्ये काय लिहिले...
“आता जगण्याची इच्छा होत नाहीये. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणे भीत्रेपणाचे लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचे होते. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतले नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटते… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही… मुंबईत अनेक वर्षांपासून आहे… खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो... डबिंग केले. जिम ट्रेनर झालो. वन रुम किचनमध्ये आम्ही 6 जण राहत होतो... स्ट्रगल होते पण समाधान होते. आज मी खूप काही मिळवले आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात खूप काही बदलले आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला वाटते की सर्वकाही ठीक सुरु आहे... कारण ते फक्त आमच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळे खोटे आहे... जगाला चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सगळे खोटे आहे,' असे संदीपने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले.

इतकेच नाही तर संदीपने आपल्या पोस्टमध्ये एक विनंती करताना म्हटले की, “एक रिक्वेस्ट है…मेरे जाने के बाद कांचन को कुछ मत बोलना पर उसके दिमाग का इलाज जरुर करवा लेना”, असे त्याने सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे.