आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरुन:अभिनेता संजय दत्तने घेतली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांची भेट, सोशल मीडियावर ट्रोल झाला अभिनेता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांची भेट दुबईत झाल्याचे सांगितले जात आहे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव जगजाहीर आहे. भारताविरोधात कट रचणे, कुरघोड्या करणे, दहशतवादी हल्ले घडवून आणणे, हे पाकिस्तानचे नित्याचे काम आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. झाले असे की, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे एका फोटोत एकत्र दिसत आहेत. दोघांच्या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटक-यांनी संजय दत्तला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

दुबईत झाली भेट
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोत संजय दत्त आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ हे दोघेही एकत्र दिसत आहे. दोघांची भेट दुबईत झाल्याचे सांगितले जात आहे. फोटोत परवेझ मुशर्रफ व्हील चेअरवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. तर संजय दत्त हा त्यांच्या समोर उभा आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली.

ट्रोल होतोय संजय दत्त
संजय आणि मुशर्रफ यांचा फोटो समोर आल्यानंतर नेटक-यांनी संजय दत्तला ट्रोल करायला सुरुवात केली आहेत, तर अनेकांनी मुशर्रफ यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांच्या मते ते दोघेही अचानक भेटले. तर एका नेटकऱ्याने म्हटले की, संजय दत्त हा मुशर्रफ यांच्यासोबत हँगआऊट करत आहेत, नक्की काय सुरु आहे, असा प्रश्न विचारला आहे. संजय दत्त आणि मुशर्रफ यांच्या भेटीबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

संजय दत्तला ट्रोल करताना एका नेटक-यांनी लिहिले, 'कारगिलच्या मास्टरमाइंडसोबत बॉलिवूड अभिनेता काय मूर्खपणा करत आहे. संजयला ड्रग्ज, दारू, बंदुका आणि दाऊद इब्राहिम आवडतात.'

याबाबत अद्याप संजय दत्तकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ही भेट नेमकी का झाली? यावेळी नेमके काय बोलणे झाले? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...