आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sanjay Dutt Took A Second Opinion From America, From There He Was Told That The Treatment Of That Thing Is Also Available In India, So Sanju Is Taking Treatment In Kokilaben: Dr. Jalil Parker

लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा खुलासा:संजय दत्तने अमेरिकेतील डॉक्टरांचा सल्ला घेऊनच परदेशी जाण्याचा निर्णय लांबणीवर टाकला, तूर्त मुंबईतील डाॅक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु

अमित कर्ण, मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अभिनेता संजय दत्तने 11 ऑगस्ट रोजी कामातून ब्रेक घेत असल्याची माहिती दिली होती.
 • त्यानंतर संजयला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचा खुलासा झाला होता.

अभिनेता संजय दत्त फुफ्फुसाच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी देशाच्या बाहेर जाणार नाही. सुरुवातीचे उपचार मुंबईतच होणार आहेत. ही गोष्ट त्याची पत्नी मान्यता दत्तने मंगळवारी उशिरा रात्री एक निवेदन जारी करत कळवली होती. आता संजयच्या हेल्थ अपडेटशी निगडीत काही गोष्टी लीलावती हॉस्पिटलचे डॉ. जलील पारकर यांनी दैनिक भास्करसोबत शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, संजय दत्तने अमेरिकेतील डॉक्टरांकडून सेकंड ओपिनियन घेतले आणि त्यानंतर त्याने देशाबाहेर जाण्याचा निर्णय लांबणीवर टाकला.

भास्करसोबत झालेल्या खास बातचीतमध्ये डॉ. पारकर म्हणाले, 'संजय दत्त जेव्हा रूग्णालयात आला तेव्हा त्याची सिटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड आणि बेसिक ब्लड टेस्ट घेण्यात आली होती. त्याच्या फुफ्फुसांच्या उजव्या बाजूला असलेले पाणीही काढून तपासणीसाठी पाठवले गेले. यानंतर, सर्व रिपोर्टच्या आधारे त्याला निदान देण्यात आले. रिपोर्टच्या 48 तासातच संजय घरी गेला होता.'

पुढे डॉ. पारकर यांनी सांगितले की, 'त्यानंतर पुन्हा दोन दिवसांपूर्वी दुपारी संजय लीलावती रुग्णालयात आला. आम्ही अजून ब-याच चाचण्या केल्या. अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि काही ब्लड टेस्टचा यात समावेश होता. या सर्व चाचण्या झाल्यानंतर संजय संध्याकाळी पाच वाजता निघून गेला. आम्ही जे रिपोर्ट आणि निदान दिले, जो उपचाराचा प्रोटोकॉल दिला, त्यावर संजयने सेकंड ओपिनियन घेण्याची इच्छा व्यक्त केली. सेकंड ओपिनियनसाठी सर्व रिपोर्ट अमेरिकेतील डॉक्टरांना पाठवणार असल्याचे त्याने सांगितले.'

डॉ. पारकर पुढे म्हणाले, 'संजयला अमेरिकेतून जे सेकंड ओपिनियन मिळाले, ते अगदी आम्ही देणार असलेल्या उपचारांसारखेच आहे. पण तरीही संजयने कोकिलाबेन येथे उपचार घेण्याचे ठरवले आहे. आम्ही जे उपचार देणार होतो त्याच्या स्टेप्स देखील अमेरिकन डॉक्टरांनी अगदी सारख्या असल्याचे सांगितले. याहून अधिक मी काही सांगू शकत नाही अन्यथा ते गोपनीयतेचा भंग होईल', असे डॉक्टर म्हणाले.

डॉ. पारकर यांच्या म्हणण्यानुसार, संजय दत्तच्या कोट्यवधी चाहत्यांना त्याला कर्करोग आहे का? किंवा तो कोणत्या स्टेजचा आहे, ते मी सांगू शकत नाही. मात्र उपचारांनंतर उर्वरित चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करणार असल्याचे संजयने सांगितले होते, असे पारकर म्हणाले.

पत्नी मान्यता दत्तने निवेदन जारी करुन दिली होती माहिती

 • संजय दत्त, फुफ्फुसाच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी देशाच्या बाहेर जाणार नसून सुरुवातीचे उपचार मुंबईतच होणार असल्याचे संजयची पत्नी मान्यता दत्तने एका निवेदनातून सांगितले होते. यापूर्वी संजय पत्नी आणि बहीण प्रियासोबत कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला होता. तेथे संजूने छायाचित्रकारांना आपल्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.
 • मान्यताने निवेदनात लिहिले होते, संजूच्या सर्वच चाहते आणि शुभचिंतकांचा मी आभार व्यक्त करू शकत नाही. आपल्या जीवनात संजूने बरेच चढ-उतार पाहिले. मात्र ज्या गोष्टीने त्याला दिलासा दिला ते तुमचे प्रेम आणि सहकार्य होते. आम्ही आज ज्या परिस्थितीत आहोत त्यासाठी तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करते.
 • ही दीर्घ लढाई आणि प्रवास आहे. संजूसाठी सकारात्मक राहून विचार करावा लागणार आहे. या काळात विलगीकरणामुळे मी संजूसोबत रुग्णालयात राहू शकत नाही.
 • प्रियाने दोन दशकांपासून कुटुंबाने चालवलेल्या कॅन्सर फाउंडेशनसोबत काम केले आहे. त्यांनी आपल्या आईला त्या आजाराशी लढताना पाहिले आहे. तीच या लढाईत आमची मशाल घेऊन उभी आहे, तर किल्ला मी सांभाळणार आहे.
 • लोक सतत विचारत आहेत, संजूचा उपचार कुठे करणार आहे. त्यांना मी संागू इच्छित आहे की, आम्ही मुंबईतच उपचार करणार आहोत. कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आम्ही पुढची योजना आखणार आहोत.
बातम्या आणखी आहेत...