आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हेल्थ अपडेट:अभिनेता संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज, 8 ऑगस्टला श्वासोच्छ्वासाच्या त्रासानंतर लीलावती रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी रात्री श्वासोच्छ्वासाच्या त्रासानंत संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • त्याच रात्री, संजयने ट्विटरवर आपले हेल्थ अपडेट देताना कोविड -19 ची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे सांगितले होते.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्याला 8 ऑगस्ट रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याची कोविड - 19 ची चाचणीही झाली होती, जी निगेटिव्ह आली होती.

रविवारी संजयचा निकटवर्तीय आणि चित्रपट दिग्दर्शक अजय अरोरा उर्फ ​​बिट्टू यांनी दैनिक भास्करला सांगितले की, 'संजूला कोणताही मोठा त्रास नाही. बदलत्या हवामानामुळे त्याला थोडा त्रास झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व चाचण्या करुन घ्याव्या असा विचार त्याने केला. त्याची कोविडची चाचणीही झआली. ती निगेटिव्ह आली', अशी माहिती बिट्टू यांनी दिली.

  • संजू बाबा मुंबईत एकटाच आहे

संजय दत्त मुंबईत एकटाच राहत आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यापासून त्याची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुले इकरा आणि शाहरान दुबईमध्ये अडकले आहेत. फोन कॉल्स आणि ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगद्वारे ते संजयच्या संपर्कात असतात.

  • पहिला रिपोर्ट आला होता निगेटिव्ह

संजय दत्तला लिलावती रुग्णालयातील नॉन कोविड आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. संजय दत्तला मुख्यत: श्वसनाचा त्रास जाणवत होती. त्याची ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत होती. संजय दत्तला कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला. संजयने शनिवारी रात्री ट्विट करुन आपल्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली होती.