आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्यासोबत खास बातचीत:अभिनेता शरद केळकर म्हणाला - ‘भुज...’च्या सेटवर आम्ही सर्वांनी देवाचे नाव घेऊन शूट केले

उमेश कुमार उपाध्यायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता अजय देवगणसोबत शरद केळकर झळकणार आहे.

शरद केळकरने नुकतेच ‘द फॅमिली मन-2’ सिरीजमध्ये झळकला आहे. त्याचा आगामी सिनेमा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ आहे. या चित्रपटात तो एका लष्कार अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याशी हा झालेला हा संवाद...

  • ‘भुज...’च्या सेटवर वातावरण कसे होते ?

कोविडच्या वातावरणात शूटिंगला सुरुवात झाली होती.. जेव्हा आम्ही राजस्थानमधील एका कारखान्यात शूट करत होतो. तेव्हा तेथील 80 टक्के लोकांना शिंका येत होत्या. त्या वेळी खूपच भीती वाटत होती. आम्ही जितके दिवस शूट केले त्या वेळी घाबरत घाबरत देवाचे नाव घेत शूटिंग केले.

  • ‘भुज...’कधी पाहायला मिळेल?

13 ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. आम्ही डबिंग पूर्ण केले. काही व्हीएफएक्सचे काम चालू आहे. ट्रेलर लवकरच येईल, याची आशा आहे.

  • अजय देवगण आणि संजय दत्तसोबत काम करून कसे वाटले?

अजय सरांसाेबत शूटिंग करताना अ‍ॅक्शनवर चांगलेच लक्ष दिले पाहिजे कारण तो अ‍ॅक्शनमध्ये पारंगत आहे. संजय दत्त यांचा स्वभाव खूपच वेगळा आहे. म्हणजे, इतका मोठा आजार असूनही आपण त्यांना पाहिले तर विश्वास वाटत नाही. ते एक सुपरमॅन आहेत असे वाटते.

  • ‘द फॅमिली मन 2’ साठी तुला प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळाली?

ही मालिका आणि यातील सर्व कलाकार खूपच चांगले आहेत. चांगल्या मालिकेत काम करणे चांगले असते. आतापर्यंत एखादा खलनायक आणि महत्त्वाच्या भूमिका करण्याची संधी मिळत होती. मात्र यात एक सामान्य माणसाची भूमिका मिळाली. ते साकारून चांगले वाटले. चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. 90 टक्के लोक म्हणाले सामान्य माणसाची भूूमिका चांगली होती. तू करू शकतोस याचा विचारही केला नव्हता. कौतुक ऐकून आनंद वाटतो.

बातम्या आणखी आहेत...