आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शेरशाह':अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो - 'कॅप्टन विक्रम बत्रा यांची व्यक्तिरेखा साकारणे मोठी जबाबदारी होती'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शेरशाह' या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी लाँच करण्यात आला.

सोमवारी कारगिल विजय दिवसानिमित्त सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी यांनी आपल्या आगामी 'शेरशाह’ चित्रपटाचे ट्रेलर लाँच केले आहे. हा चित्रपट मरणाेपरांत परमवीर चक्राने सन्मानित
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कथेवर आधारित आहे. ते कारगिल युद्धात शहीद झाले होते. चित्रपटात किआरा विक्रम यांची भावी वधू डिंपल चीमा याची भूमिका साकारत आहे. दिव्य मराठीशी दोघांचा
झालेला हा संवाद ...

सिद्धार्थ म्हणाला, 'विक्रम बत्राचे भाऊ विशाल बत्रा आणि निर्माते शब्बीर बॉक्सवाला जेव्हा माझ्याकडे आले होते, तेव्हाच मी या कथेचा भाग होण्याचे ठरवले होते. विक्रम बत्रा यांची कहाणी मला जाणून घ्यायची होती, त्यांच्या जीवनात बरेच काही होते जे मला जाणून घ्यायचे होते, माझ्याकडे नाही म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. सुरुवातीला एक दुसरे निर्मिती हाऊस हा िचत्रपट बनवणार हाेते त्यानंतर अडीच वर्षांनंतर धर्मा प्रॉडक्शनला हा चित्रपट आवडला. मी या चित्रपटाशी भावनिकरीत्या जोडलाे गेलो आहे, कारण मी याचा प्रवास सुरुवातीपासून पाहिला आहे. 5 वर्षांचा खूप मोठा प्रवास असतो. यादरम्यान टीम बदलली होती, अशात काहीही झाले असते. कदाचित हा चित्रपट रद्दही झाला असता किंवा इतर कलाकारासोबत बनला असता, मात्र बत्रा कुटंुबाला मी विश्वास दिला होता की, चित्रपट नक्की येईल. जेव्हा भारतीय लष्कराच्या जवानांसमोर या चित्रपटाचे ट्रेलर लाँचे झाले तेव्हा तो क्षण आमच्यासाठी अभिमानाचा होता.'

विक्रमच्या कुटुंबासाठी हा फक्त एक चित्रपट नाही
सिद्धार्थ म्हणाला, 'मी सध्या खूपच घाबरलेलो आहे. प्रेक्षक चित्रपट पाहून काय प्रतिक्रिया देतील, याची भिती वाटत आहे. विक्रम यांच्या कुटंुबासाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट नसून मुलाची कहाणी आहे. अभिनेता म्हणून मी त्यांच्या जीवनातील खरं रूप पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या कुटुंबाला हा चित्रपट दाखवण्यासाठी घाबरलेलो आहे.'

कथेत काल्पनिक घटना टाकल्या नाहीत - किआरा
किआरा सांगते, 'डिंपल यांची भूमिका पूर्ण प्रामाणिकपणे साकारण्याचा मी प्रयत्न केला आहे. विक्रम आणि डिंपल यांची कहाणी संवेदनशील आहे. आमच्यासमोर पडद्यावर दाखवण्याची मोठी जबाबदारी आहे. मी खूपच रोमँटिक असल्याचे मला वाटत होते, पण डिंपलविषयी ऐकल्यानंतर मी त्यांच्या जवळपासही नाही याची मला जाणीव झाली, त्यांच्या डोळ्यात आजही विक्रम बत्रासाठी प्रेम दिसून येते. ते पाहून मी प्रभावित झाले. आम्ही कथेत पूर्ण खरं मांडण्याचा प्रयत्न केला आहे कुठेही काल्पनिक घडामोडी टाकल्या नाहीत.'

बातम्या आणखी आहेत...