आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू सूदने मौन सोडले:आयकर छाप्याच्या चौथ्या दिवशी सोनूने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, म्हणाला - 'तुम्हाला स्वतःला नेहमीच तुमची बाजू मांडण्याची गरज नाही काही गोष्टी वेळ सांगतो'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू सूदवर कोट्यवधींच्या अफरातफरीचा आरोप

कोरोना काळात गरीब आणि मजुरांना मदत करुन चर्चेत आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने कर बुडल्याचा आरोप केला आहे. सोनूच्या मुंबईतील सहा ठिकाणांवर आयकर विभागाने चार दिवस कारवाई केली. दरम्यान आयकर विभागाला सोनू सूदने 20 कोटी रुपयांचा कर बुडवल्याचे पुरावे मिळाले आहेत. यानंतर आता सोनूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून या सगळ्या प्रकरणावर मौन सोडले आहे. गेल्या चार दिवसांपासून मी काही पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होतो आणि म्हणून तुमची सेवा करण्यासाठी उपलब्ध नव्हतो, असे सोनू म्हणाला आहे.

सोनू सूदने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, ‘तुम्हाला स्वतःला नेहमीच तुमची बाजू मांडण्याची गरज नाही काही गोष्टी वेळ सांगतो. मी भाग्यवान आहे की, मी माझ्या संपूर्ण ताकदीने आणि मनाने भारतीय लोकांची सेवा करू शकलो. माझ्या फाउंडेशनमधील एक एक रुपया हा मौल्यवान जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंसाठी आहे. यासह, अनेक प्रसंगी, मी जाहिरात ब्रँडना माझे शुल्क दान करण्यास प्रोत्साहित केले आहे जेणेकरून कोणालाही पैशांची कमतरता भासू नये.’

सोनूने पुढे लिहिले की, ‘मी काही पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होतो आणि म्हणून गेल्या 4 दिवसांपासून तुमची सेवा करण्यासाठी उपलब्ध नव्हतो. आता मी पुन्हा एकदा आयुष्यभर तुमच्या सेवेत संपूर्ण नम्रतेने परत आलो आहे. चांगले करा, चांगलेच होईल, शेवटही चांगला होईल. माझा प्रवास चालू राहील. जय हिंद.’

कर चोरी प्रकरणी आयकर विभाग गेल्या चार दिवसांपासून कारवाई करत आहे. आयकर विभागाने सोनूच्या मुंबई, लखनौ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्रामसह 28 ठिकाणी छापेमारी केली होती. दरम्यान, सोनू सूदने 20 कोटी रुपायांची करचुकवेगिरी केल्याचा दावा आयकर विभागाने केला होता.

आयकर विभागाने त्याच्या चॅरिटी ट्रस्टवर परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप विभागाने केला आहे. आयकर विभागाच्या या दाव्यानंतर अंमलबजावणी संचालनालय याप्रकरणी चौकशी करू शकते. जेव्हा आयकर विभागाने त्याच्या आणि त्याच्याशी संबंधित लखनौ स्थित गटाच्या जागेवर छापा टाकला तेव्हा, असे आढळून आले की त्याने अनेक बनावट संस्थांकडून बनावट असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात आपले बेहिशेबी उत्पन्न दाखवले आहे.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना सोनूच्या घरातून काही कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदला मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाच्या स्वरुपात देणगी मिळाली होती. हे पैसे त्याने खर्च केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

बातम्या आणखी आहेत...