आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईहून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या प्रयत्नांमुळे अभिनेता सोनू सूद सध्या चर्चेत आहे. तो दररोज सुमारे एक हजार परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात घेऊन जात आहेत. याबद्दल दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये त्याने हे काम करण्यामागील उद्देशाविषयी सांगितले.
सोनू म्हणाला, '15 मेच्या जवळपासची गोष्ट आहे. मी ठाण्यात स्थलांतरितांना फळं आणि अन्नाच्या पाकिटांचे वाटप करीत होतो. तेव्हा त्या लोकांनी सांगितले की, ते पायी कर्नाटक आणि बिहारला जात आहेत. हे लोक मुले व वृद्ध माणसांसह कसे चालत जातील, याचा विचार करुनच मी सुन्न झालो. मी त्यांना सांगितले की, तुम्ही दोन दिवस थांबा. मी तुम्हाला पाठवण्याची व्यवस्था करतो. नाही करु शकलो तर मग जा.” अशाप्रकारे चित्रपट अभिनेता आणि निर्माता सोनू सूदने स्थलांतरितांना घरी पाठविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली.
दोन दिवसांत सोनूने कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांकडून परवानगी घेतली आणि पहिल्यांदा 350 लोकांना उत्तर प्रदेशला पाठविले. सोनू म्हणतो, “मी काम करत राहिलो आणि हा सिलसिला वाढत गेला…. पूर्वी यासाठी 10 तास काम करायचो. आता 20 तास करत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून फोन वाजतो. माझे संपूर्ण कर्मचारी, मैत्रीण नीती गोयल देखील या कामात मला साथ देत आहे.” सोनू स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर लक्ष ठेवून आहे. सोनूने सांगितले, "तो दररोज 1000 ते 1200 लोकांना उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, कर्नाटकात पाठवित आहे."
मदत म्हणून लोकांना घरी पाठवण्याचेच काम हाती का घेतले? या प्रश्नावर त्याने सांगितले की, जेव्हा त्याने या लोकांना त्यांच्या लहान मुलांसमवेत पायी चालताना पाहिले, तेव्हा ही मुले त्यांच्या वडिलांना पोलिसांनी मारले, घरातील म्हातारी माणसं वाटेतच मृत पावली, अशा किती तरी वाईट आठवणी घेऊन मोठी होतील. मला कमीतकमी काही मुलांच्या आठवणी चांगल्या बनवायच्या आहेत. मी मोगाहून मुंबईला आलो होतो, तेव्हा माझ्याकडे आरक्षण नव्हते. पैसे नव्हते. मला वाटले की, हे लोक माझ्यापेक्षा वाईट परिस्थितीत घरी जात आहेत.
सोनू पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील आहे. तो व्यवसायाने अभियंता आहे. आई सरोज प्रोफेसर होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गरीब मुलांना शिकवायच्या. वडील शक्तीसागर यांचे कपड्यांचे एक मोठे शोरूम होते, जे आज सोनू कर्मचा-यांच्या मदतीने चालवतो. तो म्हणतो की, आमच्या घरात इतरांना मदत करण्याची एवढी आवड होती की माझे आईवडील म्हणायचे, गरिबांना मदत करणे म्हणजे यशस्वी होणे होय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.