आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

संकटात मदतीचा हात :बस आणि ट्रेननंतर आता चार्टर्ड विमानाने कामगारांना घरी पाठवण्याचे काम करतोय सोनू सूद, देहरादूनला पोहोचले 170 लोक  

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व कामगारांच्या तिकीटाचा खर्च सोनू सुदने केला होता.

लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याचे काम अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून करतोय. सोनूने बसने आतापर्यंत कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार येथील हजारो मजुरांना स्वखर्चाने  त्यांच्या घरी पोहोचवले आहे.  आता पुन्हा एकदा सोनूने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. उत्तराखंडातील देहरादून येथील 170 कामगारांसाठी सोनूने खास चार्टर्ड विमानाची सोय केली आहे. 

एअर एशिया कंपनीचे हे चार्टर्ड विमान  170 कामगारांना घेऊन मुंबई विमानतळावरुन शुक्रवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान उडाले. 4 वाजून 41 मिनिटांनी हे सर्व कामगार देहरादूनच्या जॉली ग्रांट विमानतळावर पोहचले होते. एअर एशिया कंपनीच्या प्रवक्त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. एअर एशियाने या फ्लाइटला 'उम्मीद की उडान' असे नाव दिले आहे. 


सोनूने स्वतः बघितली संपूर्ण व्यवस्था

सेलेब फोटोग्राफर विरल भयानी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात सोनू उड्डाणापूर्वीची व्यवस्था बघण्यासाठी स्वतः मुंबई विमानतळावर पोहोचला होता. सर्व कामगारांच्या तिकीटाचा खर्च सोनू सुदने केला होता.

“चार्टर्ड विमान या कामगारांना घेऊन गेल्यानंतर, मी अजुनही अडकलेल्या कामगारांना मदत करु शकतो हा आत्मविश्वास मला मिळाला आहे. त्यांच्यापैकी अनेक कामगारांनी कधीही विमानप्रवासाची कल्पना केली नव्हती. पण ज्यावेळी त्यांना मी तुम्ही विमानाने घरी जाणार आहात असे सांगितले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंद पाहण्यासारखा होता.” सोनूने आपली भावना व्यक्त केली.

रेल्वेने 1000 हून अधिक लोकांना घरी पाठवले  

सोनूने यूपी आणि बिहारमधील 1000 हून अधिक मजुरांना रेल्वेने त्यांच्या घरी पाठवले आहे. त्यांना सोडण्यासाठी स्वतः सोनू मध्यरात्री दोन वाजता ठाणे रेल्वे स्टेशनवर हजर होता. येथे सोनूने सर्व प्रशावांना मास्क, सेनिटायझर्स आणि खाद्यपदार्थांची पाकिटे दिली होती. यापूर्वी सोनूने हजारो मजूर आणि स्थलांतरितांना बसने त्यांच्या गावी पोहोचवले आहे. याशिवाय केरळमध्ये अडकलेल्या 177 महिलांना त्याने विमानाने घरी पाठवले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी सोनू आणि त्याच्या टीमने टोल फ्री आणि व्हॉट्सअॅप नंबरही दिला आहे,

टीव्ही अभिनेत्याच्या मदतीसाठी पुढे आला

अभिनेता राजेश करीर यांनी अलीकडेच स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन लोकांकडे आर्थिक मदतीचा हात मागितला होता. 400 किंवा 500 रुपये मदत म्हणून द्यावे अशी विनंती त्यांनी केली होती. सोबतच पंजाबला परतायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. हा व्हिडीओ बघून सोनूने स्वतः राजेश यांना कॉल करुन त्यांची अडचण जाणून घेतली आणि पंजाबला परतायचे असल्यास शक्य ती मदत करण्याचे आश्वासन त्यांना दिले.

रात्रंदिवस सेवा करत आहे

सोनू सूदची पत्नी सोनाली सूद यांनी अलीकडेच दिव्य मराठीसोबत बोलताना सांगितले की, सोनू त्याला जमेल तशी गरजुंची मदत करत आहे. तो फक्त 5 तास झोपतो आणि 18 तास काम करतोय. सोनूने आतापर्यंत 25 हजारांहून अधिक लोकांना त्यांच्या घरी पोहोचवले आहे

0