आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सूर्या 42'चे मोशन पोस्टर रिलीज:पॅन इंडिया नव्हे पॅन ग्लोबल रिलीज होणार फिल्म, 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल चित्रपट

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी पट्ट्यात दक्षिण भारतीय चित्रपटांचे वर्चस्व आहे. दरम्यान, तामिळ चित्रपट 'सूर्या 42' ची घोषणा करण्यात आली आहे, जो पॅन इंडिया नव्हे तर पॅन वर्ल्ड रिलीज होणार आहे. या चित्रपटात तामिळ सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ती या चित्रपटाद्वारे तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सूर्या 42 चा टिझर 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला होता, हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लगेचच चर्चेत आला आहे.

पोस्टरमध्ये दिसले दमदार व्हीएफएक्स
मोशन पोस्टर पाहता चित्रपटात दमदार व्हीएफएक्सची ट्रीट असेल असे दिसत आहे. या 1 मिनिटाच्या मोशन पोस्टरची सुरुवात आकाशात उडणाऱ्या गरुडाने होते. खाली आग आणि काळा धूर दिसत आहे. पोस्टरच्या शेवटी एक योद्धा उभा दिसतो आणि अचानक एक उडणारा गरुड योद्धाच्या खांद्यावर बसतो. पोस्टरसोबतच पार्श्वसंगीतही ऐकायला मिळतंय. 'सूर्या 42' चे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे, त्यांनीच पुष्पा चित्रपटातील आपल्या संगीताने सर्वांना इम्प्रेस केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिवा करत आहेत. टिझर पाहिल्यानंतर सूर्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सूर्याला त्याच्या सूरराई पोट्टरु या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मोठ्या स्तरावर बनणार 'सूर्या 42'
सूर्याचे निर्माते हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनवत असून हा एक मेगा बजेट प्रोजेक्ट असणार आहे. यासोबतच हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. सूर्या 42 एक किंवा दोन भाषांमध्ये नाही तर 10 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सुपरस्टार सूर्याने ऑगस्टपासूनच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

साऊथच्या चित्रपटांनी केले आहेत अनेक विक्रम
2022 हे वर्ष दाक्षिणात्य चित्रपटांच्या नावावर आहे. KGF, RRR, पुष्पा, वलीमाई, कार्तिकेय आणि विक्रम यांनी हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. KGF 2 ने हिंदी पट्ट्यात अनेक विक्रम केले, त्याच्या हिंदी आवृत्तीने 432 कोटी रुपयांची कमाई केली. हा विक्रम बराच काळ कुणीही मोडित काढू शकलेले नाही. दुसरीकडे RRR ने हिंदी पट्ट्यात 280 कोटींचे कलेक्शन केले. याशिवाय अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या कार्तिकेय 2 नेही हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अशा स्थितीत निर्मात्यांना सूर्याचे मेकिंग उत्तम पद्धतीने करायचे आहे.

बातम्या आणखी आहेत...