आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उरल्या त्या आठवणी:सुशांतने 11 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला होता आईचा फोटो

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवुडमधून रविवारी एक दुखद घटना समोर आली. अॅक्टर सुशांत सिंह राजपूतने मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अद्याप यामागचा खुलासा झाला नाही. सुशांतने आपली शेवटची सोशल मीडिया पोस्टमध्ये आईचा फोटो शेअर करत, आयुष्याला क्षणभंगूर म्हटले होते.

सुशांतने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट 3 मे रोजी शेअर केली होती. त्यात त्याने स्वतःचा आणि आईचा फोटो शेअर केला होता. त्यासोबत लिहीले होते, "अश्रूंच्या थेंबांतून अंधुक होत जाणारा भूतकाळ. एकीकडं, कधीच अंत नसलेली स्वप्नं हास्याचं इंद्रधनु फुलवताहेत आणि त्याचवेळी समोर हे क्षणभंगुर जगणं. या दोन्हींमधून मी काय निवडायचं, आई?"

आईचा मृत्यू, सर्वात दुःद क्षण

सुशांतच्या आईचा मृत्यू 2002 मध्ये झाला होता. जानेवारी 2016 मध्ये दिलेल्या एका इंटरव्ह्यूदरम्यान त्याने आईच्या मृत्यूला आयुष्यातील सर्वात दुखद क्षण म्हटले होते. 

बातम्या आणखी आहेत...