आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant Singh Rajput Depression Suicide Death Reason Bollywood Camps Politics Update Part Two | All You Need To Know About Why Talent Management Is An Important For Bollywood | 10 Big Camp Dominates In The Film Industry; This Is Why Celeb Kids Get Over Talent Like Sushant.

बॉलिवूडमधील घराणेशाही:फिल्म इंडस्ट्रीत आहे 10 मोठ्या कॅम्पचा दबदबा; त्यामुळे सुशांत सिंह राजपूतसारख्या टॅलेंटवर वरचढ ठरतात स्टार किड्स 

मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 2019 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीने 4000 कोटींच्या कमाईचा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता, त्यापैकी जवळजवळ 50% वाटा हा 10 मोठ्या चित्रपटांचा आहे.
 • बॉलिवूडमध्ये सुशांतसारख्या प्रतिभा तेव्हाच टिकतात जेव्हा त्यांच्या कुणी गॉडफादर असतो आणि त्यांना सतत काम मिळत राहतं.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही. 15 जूनला सुशांतच्या अंत्यसंस्कारानंतर बॉलिवूडमध्ये सेलेब्स किड्सविषयी नेपोटिज्म आणि ऑऊटसाइडर्स विषयी होणाऱ्या गटबाजीचा विरोध मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

इंडस्ट्रीला अस्वस्थ करतात 3 गोष्टी

 • कंगणा रनोटने दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला. यानंतर अनेक लोक तिच्यासोबत उभे राहिले. प्रीतीश नंदी म्हणाले की, बॉलिवूडमधील क्रूरतेला गेम नाही तर गँग जबाबदार आहे. या गँगला सर्व काही कंट्रोल करायचे आहे. अशीच प्रतिक्रिया रोज येत आहे.
 • पोलिसही प्रोफेशनल नेपोटिज्म आणि बॉयकाटविषयीच्या अँगलचा तपास करत आहे. यामुळे त्यांच्याकडून सर्वात ताकदवान म्हटल्या जाणाऱ्या यशराज फिल्म्समधून सुशांतसोबत केलेल्या कॉन्ट्रेक्टचे कागदपत्र घेण्यात आले आहेत. पोलिस रिया चक्रवर्तीच्या अँगलनेही बारीक तपास करत आहे. कारण सुशांतच्या तीन कंपन्यांमधून दोन कंपन्यांमध्ये रिया पार्टनर होती.
 • गटबाजी, नेपोटिज्म आणि बॉयकॉट सारखे शब्द अडकावे आणि नवीन प्रोजेक्ट अडचणीत सापडू नये यासाठी अनेक ठिकाणी सुशांतने डिप्रेशनमुळे जीव दिला, त्याच्याकडे कामांची कमी नव्हती असे मेसेज पाठवले जात आहे.
10 जानेवारी 2019 रोजी पीएम मोदी यांच्यासोबत बॉलिवूड स्टार्सची सेल्फी आणि करण जोहरचा मेसेज
10 जानेवारी 2019 रोजी पीएम मोदी यांच्यासोबत बॉलिवूड स्टार्सची सेल्फी आणि करण जोहरचा मेसेज

आजच्या या रिपोर्टमधून समजून घेऊयात बॉलिवूडमधील गटबाजीची ताकद आणि त्यांच्या कामाची पद्धत 

 • बॉलिवूड म्हणजे एक मोठे गाव आणि अनेक शेतकरी

मुंबई येथील भारतातील सर्वात मोठी चित्रपट इंडस्ट्री वास्तवात अनेक भागांमध्ये विभागलेली आहे. येथे, कुणा एकाची सत्ता चालत नाही. तर अनेक मोठ्या गटांचे वर्चस्व आहे. याला कॅम्प असे म्हणतात. फिल्म इंडस्ट्रीला जवळून जाणणारे आशुतोष अग्निहोत्री म्हणतात की बॉलिवूड हे एक मोठे गाव मानले जाऊ शकते, जिथे शक्तिशाली शेतकरी आपापल्या शेतात आपल्या हिशोबाने पिक उगवतात.

वास्तविक बॉलिवूड हे कोण्या एका जागेचे नाव नाही. बरेच लोक यशराज रोड म्हणजेच अंधेरी किंवा वरसोवा मधील वीरा देसाई रोडला बॉलिवूड समजतात. तर बरेच लोखंडवाला कॉम्प्लेक्स मानतात. परंतु संपूर्ण मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बरेच स्टुडिओ आणि कार्यालये आहेत. हे त्यांचे स्थान बदलतही राहतात.

फिल्म सिटी (दादासाहेब फाळके चित्रनगरी) गोरेगाव येथे आहे. छोट्या फिल्मचा काही भाग गोरेगाव आणि ओशिवरा येथे बनतो. आदर्श नगरमध्ये भाजपूर चित्रपट बनतात. यासाठी लोक यूपी-बिहारमधून येतात आणि येथून चित्रपट बनवून निघून जातात. जुहू, ओशिवारा आणि मड आयलँडच्या बंगले असणाऱ्या भागांना टीव्ही शोजच्या शूटिंगसाठी ओळखले जाते.

प्रतिभा संघर्ष, नशीब आणि कमाई

 • टॅलेंटचा संघर्ष, यामुळेच उजळते नशीब आणि होते कमाई

ट्रेड एक्सपर्ट म्हणतात की, 107 वर्षांच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे कँप राहिले आहेत. एकेकाळी राज कपूर, देवआनंद, राजेंद्र कुमार आणि दिलीप कुमारचे कँप असायचे. नंतर अमिताभ बच्चन, राजेश खन्नाचा कँप होता. यानंतर मिथुन आणि अनिल कपूर आणि नंतर शाहरुख आणि सलमान खानचे कँप सुरू झाले.

आता यश राज, भन्साळी प्रॉडक्शन, नाडियाडवाला, टी-सीरीज, बालाजी टेलिफिल्म्स, यूटीव्ही मोशन पिक्चर्स आणि धर्म प्रॉडक्शन सारखे मोठे कँप्त बनले आहेत. या कँपचे सामर्थ्य त्यांच्याकडे असलेल्या स्टार्सच्या संख्येवरुन लावता येऊ शकतो.  ज्यांच्याकडे स्टार किंवा स्टार किड्सचा पूल आहे अशाच प्रोड्यूसरर्ससोबत फिल्मचे करार होत आहेत.

 • असे असते टॅलेंट मॅनेजमेंट

या कॅम्पने बॉलिवूडमध्ये टॅलेंज मेनेजमेंट सुरू केले आहे. ते ज्या टॅलेंटला लॉन्च करतात, त्यांच्यासोतब तीन चित्रपटाचा करार होतो. त्यानुसार कलाकार दूसऱ्या बॅनसोबत काम करु शकत नाही. हा करार लिखित आणि अलिखित दोन्हीही फॉर्मेटमध्ये असू शकतो.

सुशांत सिंह राजपूत खूप टॅलेंटेड होता. त्याला अल्पावधित प्रसिद्धी मिळाली होती. त्याला बाहेरचे चित्रपटही मोठ्या प्रमाणात मिळत होते. मात्र अॅग्रीमेंटमुळे तो साइन करु शकत नव्हता. व्यावसायिक गटबाजीमुळे तो डिप्रेशनमध्ये गेलो होता आणि त्याला 7 चित्रपटांमधून काढण्यात आले होते असा आरोप लावला जात आहे. तसेच त्याचे दोन चित्रपट रिलीज होऊ दिले नव्हते.

सुशांत प्रकरणानंतर हे स्पष्ट झाले की, मोठ्या प्रॉडक्शन हाउसेजमध्ये टॅलेंटचा खूप संघर्ष आहे. ज्याच्याकडे जेवढे जास्त टॅलेंट, त्यांच्या बॅनरची फिल्म किंवा वेब शोची तेवढी मोठी किंमत असते.

 • 2019 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीने विक्रमी 4000 कोटींची कमाई केली होती आणि मोठ्या बॅनरच्या पहिल्या दहा चित्रपटांमध्ये यात जवळपास 50% टक्के वाटा होता.
 • स्मार्ट आणि कॉर्पोरेट पद्धतीने चालतात कॅम्प

एखाद्या कलाकाराला साइन करताना मोठे बॅनर करार करतात. नवीन प्रतिभेसाठी मोठ्या बॅनरमध्ये काम केल्यामुळे लवकरच प्रसिद्धी मिळण्याची शक्यता जास्त असते. पण, कराराच्या वेळी, पुढे काय होईल हे लक्षात येत नाही.

व्यापार पंडितांच्या मते, करण जोहर आणि साजिद नाडियाडवालासारखे लोक हे जुने आणि स्मार्ट प्रोड्युसर्स आहेत. हे कॉर्पोरेट निर्माते चित्रपटात स्वतःच्या खिशापेक्षा कॉर्पोरेट स्टुडिओचा पैसा गुंतवत असतात. कॉर्पोरेट स्टुडिओ या नियमावर काम करतात आणि ज्यांच्याजवळ जुना किंवा उदयोन्मुख कलाकार आहे, त्यांच्या चित्रपटावरच ते पैसा लावतात. 

 • करण जोहर हा इंडस्ट्रीमधील सर्वात हुशार प्लेअर आहे

याची सुरूवात करण जोहरने 'माय नेम इज खान'पासून केली होती. त्यानंतर त्याचा फॉक्स स्टार इंडियाशी करार झाला. फॉक्स स्टार इंडिया आता डिस्ने इंडिया आहे. फॉक्स स्टार आणि करण जोहर यांच्यात 200 कोटींचा करार झाला होता. त्या 200 कोटी रुपयांसाठी करण जोहरला सहा चित्रपट बनवून फॉक्सला द्यायचे होते. जेव्हा दोघांमधील संबंध दृढ झाले, तेव्हा ही डील 9 चित्रपटांवर गेली. दोघांचा शेवटचा चित्रपट 'कलंक' होता.

फ्लॉप ठरलेल्या 'कलंक'पर्यंत त्याचे रेट वाढले होते. करण जोहरला फॉक्सकडून सुमारे 100 कोटीं रुपये भेटले होते. करण त्याची भरपाई करण्यास तयार होता. फॉक्सला 30 कोटी रुपये परत करायचे होते. हे घडले की नाही याची माहिती समोर आली नाही. करण आता वेब शो करत आहे. शोजची संपूर्ण डील नेटफ्लिक्ससोबत झाली आहे. करणची धर्माटिक नावाची आणखी एक कंपनी असून ती वेब शो बनवते. आणि ही कंपनी आता फक्त नेटफ्लिक्ससाठीच शो बनवते,  इतर कुणासाठीही नाही.

 • होमवर्क करून स्टार किड्सना लाँच करतात

जाणकार सांगतात की, करण जोहर किंवा एखाद्याची मोठी कमाई तेव्हाच होते, जेव्हा त्यांच्या सिनेमांमध्ये आणि वेब शोमध्ये सोशल मीडियावर वर्चस्व असलेले मोठे चेहरे असतील.  हेच कारण आहे की, कोणत्याही स्टार किड्सला लाँच करण्यापूर्वी ते त्यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट्स मजबूत करतात. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि इमोशनल पोस्ट टाकून त्या स्टार किडची फॅन फॉलोईंगवाढवली जाते. आई झाल्यानंतर करीना कपूर खानचे रिलाँचिंग हे याचेच एक उदाहरण आहे.

 • यशराजने कौशल्य कसे टिकवायचे हे शिकवले

टॅलेंट रिटेन करण्याची प्रथा यशराजने सुरु केली. शाहरुखनंतर त्यांच्याजवळ रणवीर सिंह, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, भूमी पेडणेकर, अर्जुन कपूर यासारख्या टॅलेंटेड कलाकारांची  मोठी यादी आहे. तर शरद काटरिया, अली अब्बास जफर, कबीर खान हे दिग्दर्शक त्यांच्यासोबत करारात आहेत.

यशराजचा चित्रपट किंवा वेब शो बनवण्याची पद्धत करण जोहरपेक्षा थोडी वेगळी आहे. हे सर्वकाही स्वबळावर करतात. ते कुठल्याही स्टुडिओसोबत लवकर संबंध जोडत नाही. ते स्वतः चित्रपट बनवतात. मार्केंटिंग करतात आणि अखेरीस डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील विकतात. यशराजच्या चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क जास्त किंमतीत विकले जातात.

 • कुणीही टाळत नाही साजिद नाडियाडवालाचा शब्द

साजिद नाडियाडवालाजवळ उद्योन्मुख कलाकारांचा टॅलेंट पूल आहे. टायगर श्रॉफ, क्रिती सेनन, नवाजुद्दीन सिद्दीकी ही नावे त्यांच्यासोबत दिसतात. इतकेच नाही तर साजिद नाडियाडवालांचा इंडस्ट्रीत एवढा दबदबा आहे की, सलमान, अक्षय कुमारसारखे सुपरस्टार त्यांचा शब्द टाळत नाही आणि त्यांच्या चित्रपटात काम करायला तयार असतात. 

या सुपरस्टार्सना आपल्यासोबत काम करायला तयार करण्यासाठी सुनील दर्शन, रतन जैन, अब्बास मस्तान, व्हिनस, टीप्स या निर्मात्यांना बराच जोर लावावा लागतो. तर साजिद नाडियाडवालासारखे निर्मात्यांसाठी हा चुटकीसरशी खेळ आहे.  

 • संगीतापासून चित्रपटांपर्यंत भूषण कुमारचे वर्चस्व

टी-सीरिजची काम करण्याची पद्धत काहीशी यशराजसारखीच आहे. ते कोणत्याही कॉर्पोरेट स्टुडिओसोबत कोलॅबरेट करीत नाही. स्वतःच चित्रपट बनवतात. असे म्हणतात की, युट्यूबमधूनच त्यांची 100 कोटींची कमाई सातत्याने सुरु असते. ते म्युझिकच्या कमाईची चित्रपटांमध्ये गुंतवणूक करतात आणि तेथून चांगले उत्पन्न मिळवतात.

ते अ‍ॅमेझॉन प्राइमशी व्यवहार करत आहे. त्यांचे बहुतेक चित्रपट याच प्लॅटफॉर्मवर गेले आहेत. याशिवाय नेटफ्लिक्स आणि झीसुद्धा त्याच्यांसोबत सामील होण्यास इच्छुक आहेत. कॉर्पोरेट स्टुडिओऐवजी टी-सीरिज अजय देवगणसारख्या मोठ्या स्टार्ससह चित्रपट निर्मितीस प्राधान्य देतात कारण त्यात नफा जास्त आहे.

असे म्हटले जाते की, जर संगीत जगात एखादे पान हलले तरी भूषण कुमार यांच्या मर्जी विचारावी लागते. उदाहरणार्थ, स्ट्रीट डान्सर शूट होण्यापूर्वी अॅमेझॉनने तो 60 कोटींमध्ये खरेदी केला होता. त्याचे सॅटेलाइट अधिकार 40 कोटींना विकले गेले. अशा परिस्थितीत चित्रपटगृहांमधून कमी पैसे येऊन आणि चित्रपट फ्लॉप होऊनदेखील हा चित्रपट हिट ठरला आणि नफा कमावला.

 • आता टेबल नफ्याचे गणित समजून घ्या

टी-सीरिज कलाकारांचा पूल बनवून ठेवत नाही, मात्र त्यांची बाजारपेठ विश्वासार्ह आहे. या बॅनरचे नाव ऐकताच नावाजलेला किंवा नवोदित कलाकार कोणत्याही दिग्दर्शकाच्या चित्रपटावर सही करायला तयार असतो. मजेशीर गोष्ट म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट मोठ्या निर्मात्यास आधीच नफा मिळवून देतो. त्याला तांत्रिक भाषेत टेबल प्रॉफिट म्हणतात.

या प्रॉडक्शन हाऊसेसच्या वतीने कोणत्याही दिग्दर्शकाला किंवा लेखकाला असा थेट सांगणे असते की, तुम्ही तुमच्या कथेवर कोणत्याही स्टारचे कंसेंट लेटर आणा आणि आम्ही तुमच्या चित्रपटाची निर्मिती करू.

नाव न छापण्याच्या अटीवर एक मोठ्या ट्रेस एक्सपर्टने सांगितले - 'भन्साळींनी अलीकडच्या वर्षांत स्टुडिओलादेखील आव्हानही दिले आहे. गेल्या वर्षी सलमान खान सोबतचा 'इइंशाल्लाह' हा मोठा चित्रपट बनू शकला नाही, कारण त्यांना स्वत:ला स्टुडिओपेक्षा अधिक शेअर हवा होता, पण सलमानने हे होऊ दिले नाही.

दुर्दैवाची बाब म्हणजे चित्रपटाच्या निर्मितीपूर्वीच कमाईची वाटणी सुरू झाली होती. स्टुडिओने काही प्रमाणात भन्साळींची मागणी मान्य केली, पण जेव्हा पाणी डोक्यावर गेले, तेव्हा त्यांनी इंशाल्ला या चित्रपटातून हात काढून घेतला. 

ट्रेंडशी संबंधित 3 एक्स्पर्टसच्या नजरेतून बॉलिवूडमध्ये घराणेशाही 

 • नेपोटीझम हावी, सर्वकाही 5 - 6 बॅनरखाली सामावून गेले आहे - नरेंद्र गुप्ता, फिल्म क्रिटिक

मागील काही वर्षांपासून नेपोटीझम खूप हावी झाले असून सर्वकाही 5 - 6 बॅनरखाली सामावून गेले आहे. तुम्ही या बॅनरशी संबंधित लोकांची चमचेगिरी केली नाही, त्यांच्या हो मध्ये हो मिसळले नाही तर हे लोक तुम्हाला इंडस्ट्रीत राहू देणार नाहीत. हे या इंडस्ट्रीचे सत्य आहे.

सुशांत डिप्रेशनमध्ये होता याविषयी काहीच शंका नाही. त्याच्या डिप्रेशनचे कारण, त्याला चित्रपट न मिळणे. एक आर्टिस्ट ज्याला 'एम.एस. धोनी' आणि 'छिछोरे' सारखे दोन चित्रपट दिल्यानंतर त्याच्याकडे एकही चित्रपट नसणे ही आश्चर्याची गोष्ट आहे. छिछोरेनंतर जे चित्रपट सुशांतने साइन केले होते, ते त्याच्याकडून का काढून घेण्यात आले, याचे उत्तर कोणाकडेही नाही.

 • करण जोहर जे करत आहे ते 'फेव्हरेटिझम' आहे : आमोद मेहरा, क्रिटिक आणि जर्नलिस्ट

माझ्या मते 'नेपोटीझम' च्या नावावर डिबेट करू नये. सुशांतच्या मृत्यूनंतर डिबेट नाही तर एक कॅम्पेन चालू आहे. नेपोटीझम त्याला म्हणतात जे स्वतः आपल्या मुलांना प्रमोट करतो. करण जोहर स्वतःच्या मुलांना प्रमोट करत नाहीये. करण इतरांच्या मुलांना प्रमोट करत आहे, याचा अर्थ तो एक बिझनेसमॅन आहे. करणला त्याचे काम कसे करवून घ्यायचे हे माहिती आहे. याला 'नेपोटीझम नाही तर  'फेव्हरेटिझम' म्हणतात.

हे संपूर्ण जगात चालत आले आहे. जर कोणी आपल्या फॅमिली मेंबरसोबत काम करू इच्छित असेल तर हे चुकीचे नाही. आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक आहेत. केवळ अ‍ॅक्टर्सच नाही तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक ज्यांनी आपल्या मुलांना लाँच केले परंतु ते यशस्वी होऊ शकते नाहीत.

 • स्टार किड्स असल्यास यशाचे प्रमाण वाढते : अतुल मोहन, व्यापार विश्लेषक

इंडस्ट्रीतला 'नेपोटिज्म' आजचा नाही तर अनेक दशकांपासून आहे. हे पाऊल उचलण्यापूर्वी सुशांतच्या मनात काय होते हे कोणालाही माहिती नाही आणि ते जाणून घेता देखील येणार नाही. तो त्याच्या कारकीर्दीत खूप चांगले काम करत होता. धैर्य आणि संयमाने काम करायला हवे, हे या पिढीने समजून घ्यायला हवे. 

स्टार किड्स प्रोजेक्टमध्ये असल्याने यशाचा वेग वाढतो हे नाकारता येत नाही. लोकांमध्ये उत्साह वाढतो. मार्केटिंग चांगले होते आणि जर आपल्या चित्रपटाची संकल्पना चांगली असेल तर चित्रपटही हिट ठरतो. लोकांना चित्रपटाकडे खेचण्यासाठी हे स्टार किड्स फायदेशीर ठरतात.

शेवटी, राम गोपाल वर्मा यांचे एक रंजक ट्विट ज्याने बॉलिवूडच्या वास्तविकतेवर प्रकाश टाकला.

सुशांतच्या चाहत्यांच्या मनातील गोष्ट : निश्चितच उद्योग, राजकारण, समाज आणि कुटुंबात घराणेशाही खूप खोलवर रुजली आहे, परंतु एखाद्या इमोशनल कलाकाराला दुखावून त्याला
स्वतःचे आयुष्य संपवण्यास भाग पाडण्याइतपत आपण स्वार्थी असू शकतो का? जर काही लोकांना जाणीवपूर्वक प्रतिभा समोर येऊ द्यायची नसेल तर ते क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी लज्जास्पद
आहे, कारण जर सुशांत सिंह राजपूतसारखे 'छिछोरे लूझर' असतील तर कंगना रनोटसारख्या 'मणिकर्णिकां'चीही कमतरता नाही.

हेही वाचा :  का हरला सुशांत / खरंच भन्साळींनी सुशांत सिंह राजपूतकडून चित्रपट काढून घेतले होते आणि करण-यशराज-साजिद-एकता यांनी त्याला बॅन केले होते? (पहिला रिपोर्ट - सुशांतला चित्रपट मिळणे, काढून घेण्याची संपूर्ण कहाणी)

बातम्या आणखी आहेत...