आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Actor Sushant Singh Rajput Suicide Case Update | Sushant Singh Rajput Death Mumbai Police Investigation Today Latest News Updates; Manager To Be Questioned Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:करण जोहर, संजय लीला भंसाळी आणि सलमान खानसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत वडिलांना म्हणाला होता- चिंता करू नका, मी सर्वकाही ठीक करतो

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निर्देशावर स्थापन केलेले एक विशेष पथक येत्या एक-दोन दिवसात बॉलिवूनडमधील काही दिग्गजांची चौकशी करणार आहे. यात अनेक प्रोड्यूसर आणि प्रोडक्शन हाउसशीसंबंधित लोकांची नावे आहेत. यादरम्यान, मुज्जफरपुर कोर्टात बॉलिवूडमधील अनेकांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागमी करण्यात आली आहे. यासाठी एक याचिकादेखील दाखल करण्यात आली आहे.

वडिलांना म्हणाला होता- चिंता करू नका, मी सर्वकाही ठीक करतो

मंगळवारी सुशांतचे वडील के.के सिंह यांची साक्ष पोलिसांनी दाखल करुन घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात त्यांनी सुशांत प्रोफेशनल कारणांमुळे तणावात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सुशांतला तणावार पाहून मी त्याच्याकडे काही दिवसांसाठी राहण्यासाठी येतो, असे सांगितले होते. पण, सुशांतने नकार दिला होता आणि म्हणला होता की, तुम्ही चिंता करू नका, मी सर्वकाहीठीक करेल.

सुशांतच्या आत्महत्येनंतर शेखर कपूर आणि कंगना रनौटसह बॉलिडवूडमधील अनेकांनी यावर आवाज उठवला आणि बॉलिवूडमध्ये घारणेशाही असल्याचे म्हटले आहे. यात हा दावादेखील करण्यात येत आहे की, इंडस्ट्रीमधील गटबाजीमुळे सुशांत त्रस्त होता.

करण जोहर, संजय लीला भंसाळी, सलमान खानसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बुधवारी बिहारच्या मुज्जफरपुरमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी करण जोहर, सलमान खानसह आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यात सुधीर यांनी करण जोहर, संजय लीला भंसाळी, सलमान खान आणि एकता कपूरसह आठ लोकांचे नाव घेतले आहे. त्यांनी आरोप लावला आहे की, या सर्वांनी सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. सुधीर यांनी पुढे आरोप लावला की, सुशांतला सात चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्याच्या काही चित्रपटांच्या रिलीजमध्ये अडचण आणली. या सर्वातून सुशांतने आत्महत्या केली. सुधीर यांनी या सर्व आरोपींविरोधात आयपीसी 306, 109, 504 आणि 506 अंतर्गत केस दाखल करण्याची मागणी केली आहे.

सुशांत्या मॅनेजरची 8 तास चौकशी

मंगळवारी अंदाजे 8 तासांच्या चौकशीनंतर सुशांतचा क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पीठानी बुधवारी रात्री दिड वाजता वांद्रा पोलिस स्टेशनबाहेर आला. यावर प्रश्न विचारले असता,  सिद्धार्थने काहीही बोलण्यास नकार दिला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ पीठानीने आपल्या साक्षीत म्हटले आहे की, ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत तो सुशांतसोबत नव्हता.

बहिणींसोबत बॉलिवूडमधील निपोटीझमवर चर्चा करायचा

सूत्रांनुसार, सुशांत्या बहिणींनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सुशांत नेहमी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आणि त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करायचा. 

बातम्या आणखी आहेत...