आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, छिछोरे यांसारखे बॉलिवूड चित्रपट देणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालीआन हिने इमारतीतून उडी मारुन आपले जीवन संपवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी याबाबत पोलिसांनीदुजोरा दिलेला नाही पोलिसांनी दिशाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवला असून भावी नव-याचा जबाब नोंदवणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिशा गेल्या काही दिवसांपासून निराश होती आणि काल ती दोघांना भेटली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिशा बॉलिवूड जगातील एक प्रतिभावान पब्लिक रिलेशन मॅनेजर होती. सुशांत सिंग राजपूतशिवाय तिने रिहा चक्रवर्तीसह अनेक कलाकारांसोबत काम केले होते.
सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे काम थांबल्याने अनेक जण नैराश्यात गेल्याच्या बातम्या इंडस्ट्रीतून येत आहेत. टीव्ही जगताशी जोडले गेलेले अनेक लोक सध्या नैराश्येच्या वातावरणात जगत आहेत. अशातच काही कलाकारांनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. आता दिशा सालिआनच्या मृत्यूच्या बातमी समोर आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.