आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मनोरंजन विश्वातील आत्महत्यांची मालिका:काहींची स्वप्ने भंग झाल्यामुळे तर काहींनी आर्थिक अडचणीमुळे संपवले आयुष्य

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउनच्या 70 दिवसात अनेक कलाकारांनी निवडला मृत्यूचा मार्ग
Advertisement
Advertisement

महेंद्र सिंह धोनीचे आयुष्य पडद्यावर साकारणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आङे. काही दिवसांपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सलियननेदेखील आत्महत्या करुन आयुष्य संपवले. या दोन्ही आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. परंतू, सुशांतच्या घरात सापडलेल्या औषध आणि कागदपत्रांच्या आधारे तो प्रचंड डिप्रेशनमध्ये असल्याची माहीती आहे.

लॉकडाउनदरम्यान सुशांतच्या मृत्यूने सर्वांनाच जबर धक्का दिला आहे. याच लॉकडाउनच्या 70 दिवसात फक्त सुशांतच नाही, तर अनेक कलाकारांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. यातील अनेक कलाकार आयुष्या आणि करिअरबद्दल चिंतेत होते. यात हिंदी, तमिळ, पंजाबी अशा अनेक इंडस्ट्रीमधील कलाकार आहेत.

आर्थिक अडचणीमुळे मनमीत ग्रेवालने केली आत्महत्या

32 वर्षीय मनमीत ग्रेवालने 15 मे रोजी आत्महत्या केली होती. मनमीतच्या आत्महत्येमागे आर्थिक अडचणी असल्याचे समोर आले. त्याचा मित्र मंजीत सिंगने एक बातचीतदरम्यान सांगितले होते की, काही दिवसांपूर्वी मनमीतच्या एका मित्रानेही पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. तोदेखील आर्थिक अडचणीत होता. दोघांनीही फॉरेन ट्रीपसाठी कर्ज घेतले होते आणि याची परतफेड करू शकत नव्हते.

स्वप्नभंग झाल्यामुळे दुखी होती प्रेक्षा मेहता

'क्राइम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' सारख्या मालिकेत अभिनय केलेल्या प्रेक्षा मेहताने 25 मे रोजी उंदीरमध्ये आत्महत्या केली. 25 वर्षीय प्रेक्षाने सुसाइड नोटमध्ये लिहीले होते, ‘‘माझ्या तुटलेल्या स्वप्नांनी माझ्यातला आत्मविश्वास संपवला. मी मेलेल्या स्वप्नांसोबत जगू शकत नाही. या  निगेटिविटीसोबत जगणे अवघड आहे. मागच्या एका वर्षात मी खूप प्रयत्न केले, पण आता मी थकले आहे.’’

बॉयफ्रेंडमुळे चांदनाने दिला जीव

कमर्शियल अॅडमध्ये दिसलेली कन्नड़ अभिनेत्री आणि टीव्ही अँकर चांदना वीकेने 28 मे रोजी आत्महत्या केली. चांदनाने आत्महत्येमागे ब्वॉयफ्रेंड दिनेश गोवडाने लग्नाला नकार दिल्याचे कारण सांगितले जात आहे. तिने विष प्राषण करुन आत्महत्या केली, त्यापूर्वी तिने एक व्हिडिओ बनवला होता. त्यात ती म्हटले होती की, ‘‘तू म्हणाला होता की, मी मेले तर चांगले होईल. मी माझे आयुष्य संपवत आहे आणि यामागे तू आहेस दिनेश.’’

सडलेल्या अवस्थेत सापडले भाऊ-बहिणीचे मृतदेह

चेन्नईमध्ये तमिळ अॅक्टर श्रीधर आणि त्याची बहिण जया कल्याणीने आत्महत्या केली. दोघेही अॅक्टींग करायचे. आर्थिक अडचणीमुळे दोघांनी हे टोकाचे पाउल उचलले. अनेक दिवसानंतर घरातून वास आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

Advertisement
0