आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनुज विरवानीशी चर्चा:तनुज सांगतो - 'सिने कुटुंबातून आल्यामुळे या इंडस्ट्रीत एन्ट्री मिळते, पण ओळख आपल्या कामानेच बनवावी लागते'

रौनक केसवानी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाहते आणि फॉलोअर्सच्या संख्येमुळे बऱ्याच ऑफर्स मिळत आहेत

दिग्गज अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा मुलगा तनुज विरवानीची वेब सिरीज 'कार्टेल’ नुकतीच रिलीज झाली. याविषयी आणि चित्रपटात पदार्पण, संघर्षाविषयी तनुजसोबत झालेली चर्चा

  • बाॅलिवूडमध्ये तुझी एन्ट्री आणि प्रवास कसा झाला ?

ही एक रोलर कोस्टर राइड आहे. सुरुवातीची तीन वर्षे माझ्याकडे चांगल्या ऑफर हाेत्या. मात्र जितके प्रोेजेक्ट केले ते बाॅक्स ऑफिसवर चालले नाहीत. त्यानंतर ओटीटी प्लॅटफाॅर्मवर पाऊल ठेवल्यानंतर 'इन्साइड एज’मधून यश मिळाले.

  • कधी आई (रती अग्निहोत्री)च्या नावाचा फायदा मिळाला का ?

चित्रपटाची कौटुंबिक पार्श्वभूमी असली तर बरेच फायदे मिळत असतात. मी माझ्याविषयी सांगतो, लोकांना माझ्याकडून खूपच अपेक्षा होत्या, मात्र चित्रपट चालले नाहीत, त्यामुळे तेच लोक सल्ला देऊ लागले, फोन उचलणे बंद केले. एकूणच सिने कुटुंबातून आल्यामुळे या इंडस्ट्रीत एन्ट्री मिळते, पण कामानेच ओळख बनवावी लागते.

  • सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येमुळे प्रोजेक्टस मिळतात का ?

दु:ख होते, पण हेच खरं आहे. तुमचे फॉलोअर्स जास्त असतील तर लोक तुमच्या कामाला पसंती देतात. तुमची लोकप्रियता वाढते. त्यामुळे ऑफर्सही मिळू लागतात. कधी कधी एखाद्या भूमिकेत एखादा अभिनेता फिट बसू शकतो, असे निर्मात्यांना वाटते तेव्हा ते ऑफर देतात.

  • तुझ्याकडे कोणते प्रोजेक्ट्स आहेत? ‌

वूटवर 'इल्लीगल’चे सीझन 2 आहे. प्राइम व्हिडिओवर 'इन्साइड एज’चे तिसरे सीझन आहे, जे डिसेंबरमध्ये रिलीज होईल. 'कोड एम-2’साठी मी सध्या जेनिफर विंगेटसोबत शूट करत आहे. आणखी एक 'जॉनी जंपर’चित्रपटदेखील आहे.

बातम्या आणखी आहेत...