आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणचा 53 वा वाढदिवस:कॉलेज जीवनात गुंड होता अजय देवगण, दोनदा गेला तुरुंगात

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजय दोनदा तुरुंगात गेला

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण 2 एप्रिल रोजी त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयने सांगितल्यानुसार, कॉलेजच्या दिवसात तो गुंड होता. यापूर्वी एका मुलाखतीत अजयने खुलासा केला होता की, तो दोनदा तुरुंगात गेलाय. तसेच त्याने त्याचे वडील वीरू देवगनला न सांगता त्यांची बंदूक घेतली होती.

अजय दोनदा तुरुंगात गेला
कॉलेजच्या दिवस कसे होते, असा प्रश्न अजयला विचारला असता, त्याने उत्तर दिले, "फुल ऑन. मी दोनदा तुरुंगात गेलो आहे. मी माझ्या वडिलांची बंदूकही चोरली होती, आणि असे करणे बेकायदेशीर आहे."

अजयच्या वाट्याला संघर्ष आला नाही
अजय पुढे म्हणाला की, आयुष्यात कधीही संघर्ष करावा लागला नाही. तो सांगतो, "मला खूप कष्ट करावे लागले पण कधीच संघर्ष केला नाही. मिठीबाई कॉलेजमध्ये असतानाच माझ्या लक्षात आले की, माझा कल चित्रपटांकडेच आहे. मी 8 वर्षांचा होतो, जेव्हा मी माझ्या वडिलांना चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये मदत करायला सुरुवात केली होती. वयाच्या 12-13 वर्षापर्यंत मी स्वतः चित्रपट बनवायला लागलो होतो."

1991 मध्ये 'फूल और कांटे' चित्रपटातून पदार्पण
अजय अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. त्याने 1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर अजयने 'दिलवाले', 'दिलजले', 'जख्म', 'हम दिल दे चुके सनम', 'कंपनी', 'द लिजेंड ऑफ भगत सिंह' आणि 'तान्हाजी' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अजयचा आगामी चित्रपट 'रनवे 34'
अजय सध्या त्याच्या आगामी 'रनवे 34' या चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतिक्षेत आहे. रनवे 34 हा अजयने दिग्दर्शित केलेला तिसरा चित्रपट आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा कॅप्टन विक्रांत खन्नाभोवती फिरते. या चित्रपटात अजय देवगणने कॅप्टनची भूमिका साकारली आहे. यात त्याच्यासह अमिताभ बच्चन, बोमन इराणी, रकुल प्रीत सिंग आणि अंगिरा धर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...