आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टिझर व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत विकीने सांगितले की, हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
365 दिवस बाकी
'सॅम बहादूर'च्या टिझरच्या माध्यमातून विकीने त्याच्या व्यक्तिरेखेची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यात विकी भारतीय लष्कराच्या गणवेशात दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत विकीने कॅप्शनमध्ये लिहिले, '365 दिवस बाकी आहेत. सॅम बहादूर 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात विक्कीसोबत सान्या मल्होत्रा
मेघना गुलजार यांनी सॅम बहादूर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात विकी कौशल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सान्या मल्होत्रा सॅमच्या पत्नी सीलू माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
सॅम माणेकशॉ यांना पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले होते
3 एप्रिल 1914 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या सॅम माणेकशॉ यांचे नाव लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. भारतीय लष्करात फिल्ड मार्शल हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे माणेकशॉ हे पहिले अधिकारी होते. 1971 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले. या युद्धात त्यांनी लष्कराचे नेतृत्व केले होते. 'सॅम बहादूर' या नावानेही ते परिचित होते. माणेकशॉ यांनी आपल्या 40 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची तीन युद्धे आणि चीनसोबत 1962 साली झालेल्या युद्धांमध्ये सहभाग घेतला होता.
दुसऱ्या महायुद्धात माणेकशॉ यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या होत्या. त्यांना तत्काळ लष्कराच्या तळावर पोहोचविल्याने त्यांच्यावर उपचार झाले आणि ते वाचले. माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगिरीने 1972 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांनी त्यांना पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. तसेच यांच्या सुवर्णमयी कामगिरीमुळेच त्यांना पद्मविभूषण, फिल्ड मार्शल असे सन्मान मिळाले. 27 जून 2008 रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात माणेकशॉ यांचे निधन झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.