आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात मदतीचा हात:हलाखीच्या परिस्थितीचा सामना करणा-या 5000 कुटुंबांना मदत करणार विवेक ओबेरॉय, थेट खात्यात पैसे करणार ट्रान्सफर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडचे अनेक सेलेब्स गरजुंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणा-या कर्मचार्‍यांवर रोजीरोटीचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे अनेक सेलेब्स त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या यादीमध्ये आता अभिनेता विवेक ओबेरॉय याच्याही नावाचा समावेश झाला आहे. विवेक हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत असलेल्या 5000 कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणार आहे. 

बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार : विवेकने फिनटेक स्टार्ट-अप फायनान्सरचे संस्थापक रोहित गजभये यांच्या सहकार्याने कामगार, घरकाम करणारे, ड्रायव्हर्स आणि इतर गरीब लोकांना मदत करण्याचे ठरवले आहे. 

विवेक म्हणाला, 'हे लोक इतर शहरांमध्ये काम करतात आणि आपला उदर निर्वाह करतात, परंतु सर्व काही थोड्या काळासाठी थांबले आहे. या बर्‍याच लोकांकडे दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसेही नाहीत. ते घरभाडे, गरजेच्या वस्तू आणि मुलांना खायला देण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही 5000 कुटुंबांना मदत केली आहे.'

विवेक पुढे म्हणाले, 'या कामगारांच्या खात्यात पैसे थेट ट्रान्सफर केले जातील जेणेकरून त्यांना त्यांच्या गरजा भागवता येतील. आम्ही सोशल मीडियावर देखील एक मोहिम सुरू केली आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक मदत करू शकतील.'

बातम्या आणखी आहेत...