आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:हिना खानचे संपुर्ण कुंटुंब कोरोनाच्या विळख्यात, हिना म्हणाली- 24x7 मास्क आणि सॅनिटायझरने घेत आहे कुटुंबाची काळजी

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील कलाकार हिना खान व्यतिरिक्त संपुर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. हिना खान यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. नुकतेच हिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. हिनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, त्यात हिनाने मास्क खाली केले आहे. मात्र मास्क लावल्याने तिच्या चेहऱ्यावर मास्कचे निशाण ठळकपणे दिसत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हिना 24 तासात घरात मास्क घालत आहे. सोबतच आपल्या कुंटुंबाची देखील काळजी घेत आहे.

हिनाने चाहत्यांना दिला सकारात्मक संदेश

हिनाने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. हिनाने पोस्ट करत म्हटले आहे की, "हार्श रिएलिटी: आजकाल आयुष्य आणि इंस्टाग्राम दोन्ही मुख्यतः चांगले फोटो आणि चांगले व्हिज्युअल आहेत. परंतु जेव्हा ते 2020x2 (2022) असते तेव्हा मला वाटते की वास्तविकता 2020 पेक्षा दुप्पट कठीण आहे. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असतील तेव्हाच जर तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तुम्हाला मास्क आणि सॅनिटायझरसह 24x7 तयार राहावे लागेल आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल." असे हिनाने म्हटले आहे.

पुढे हिना म्हणाली की, आपण सर्वजण कोरोनाला हरवण्यासाठी एकजुटीने काम करुया. कारण हे दिवस देखील लवकरच निघून जातील. हिनाचे संपुर्ण कुंटुंब सध्या होम क्वारंटाईन आहे. त्यात हिना 24 तास मास्कचा वापर करत आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यासाठी हिनाने बाथरुममध्ये जाऊन सेल्फी घेतली आहे.

गेल्या वर्षी झाली होती कोरोनाची लागण
2021 हे वर्ष हिनासाठी खुपच कठीण गेले आहे. कारण हिनाचे वडिल असलम खान यांचे गेल्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले होते. त्या कठीण प्रसंगी हिना वडिलांजवळ होती. काश्मीरमध्ये एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी हिना गेली असता, वडिलांच्या प्रकृतीची बातमी समोर येताच हिना काश्मीरमधून मुंबईला रवाना झाली होती. त्याच्या काही दिवसानंतर हिना कोरोनाच्या विळख्यात सापडली होती.

बातम्या आणखी आहेत...