आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी त्याचे चाहते, कुटुंबातील सदस्य आणि बॉलिवूडमधील काही कलाकार सातत्याने करत आहेत. दरम्यान, त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करणारे ट्विट केले आहे. यासंदर्भात तिने पंतप्रधानांच्या नावी एक ओपन लेटर लिहिले आहे.
श्वेता सिंह किर्तीने मोदींच्या नावे लिहिले- ‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’ असे म्हटले असून हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.
या ट्विटमध्ये श्वेताने पुढे लिहिले, नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याच्या कोणी गॉडफादर नव्हता आणि आताही नाही. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही अशी मी विनंती करते या आशयाची पोस्ट तिने केली आहे.
14 जून रोजी सुशांत सिंहने मुंबईत त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.. माध्यमांच्या वृत्तानुसार तो गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात होता, परंतु आत्महत्येमागील खरे कारण अद्यापपर्यंत समोर आले नाही.
श्वेताने एक पोस्ट शेअर केली. यात तिने सुशांतने व्हाईट बोर्डवर बनवलेल्या आपल्या रुटीन प्लानचा फोटो शेअर केला. श्वेताने सांगितले की, तो 29 जूनपासून ही दिनचर्या सुरु करणार होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.