आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये प्रचंड बिझी आहे. मात्र, दिवस रात्र काम केल्यामुळे आलियाच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. आलिया सध्या संजय लीला भन्साळींच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र ताण आणि थकव्यामुळे आलियाची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला 17 जानेवारी रोजी सर एच.एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही तास डॉक्टरांच्या निगराणीत राहिल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.
रिपोर्ट्सनुसार, आलियाला 17 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला. बरं वाटल्यानंतर आलिया दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 जानेवारी रोजी गंगूबाई काठियावाडीच्या शूटवर पोहचली. तथापि, आलिया हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याबद्दल चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दिवाळीत रिलीज होणार 'गंगूबाई काठियावाडी'
रिपोर्टनुसार, 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट यावर्षी दिवाळीत रिलीज होऊ शकतो. या चित्रपटात आलिया व्यतिरिक्त विजय राज, शांतनू माहेश्वरी आणि सीमा पाहवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिनेता अजय देवगण या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा दाखवण्यात येणार आहे.
हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे चित्रपट
सध्या या चित्रपटाचे मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रीकरण सुरु आहे. शूटिंगच्या सेट डिझायनिंगवर तब्बल साडे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित या चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी दाखवण्यात येणार आहे. असे सांगितले गेले आहे की, गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.
गंगूबाईच्या कुटुंबियांचा आक्षेप
22 डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांचे चित्रपटाबद्दल काही आक्षेप आहेत. संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन जैदी यांना त्यांचे मत मांडण्यासाठी 7 जानेवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाव्यतिरिक्त आलिया दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' आणि बाहुबली फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी 'RRR' या चित्रपटात झळकणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.