आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आरआरआर':दिग्दर्शक एसएस राजामौलींच्या 'RRR'च्या हिंदी व्हर्जनमध्ये आलिया भट्ट गाणार दोन गाणी, यापैकी एक असेल डान्स नंबर

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी आलिया गाणार गाणी

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौलींच्या बहुप्रतिक्षित 'आरआरआर' या चित्रपटाबद्दल एक बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आलिया भट्ट या चित्रपटात स्वत: साठी दोन गाणी गाणार आहे. यापूर्वी आलियाने दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'हायवे' आणि शशांक खेतानच्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटांमध्ये स्वतःसाठी गाणी गायली होती.

चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी गाणार गाणी
सूत्रांच्या माहितीनुसार, दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर स्टारर 'आरआरआर' मध्ये आलिया तिच्यावर चित्रीत होणारी गाणी स्वरबद्ध करणार आहे. यापैकी एक डान्स नंबर असेल. या चित्रपटाच्या केवळ हिंदी व्हर्जनसाठी आलिया दोन गाणी गाणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'आरआरआर' 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

आलिया भट्टने हे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, "'आरआरआर'साठी सज्ज व्हा. हा 13 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल." चित्रपटाविषयी बोलताना निर्माता डीव्हीव्ही दानय्या म्हणाले की, “आम्ही 'आरआरआर ’च्या शूटिंग शेड्यूलच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी खूप उत्सुक आहोत. प्रेक्षकांसह सिनेमागृहात दस-यासारखा मोठा उत्सव साजरा करण्यासही आम्ही खूप उत्सुक आहोत."

राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती
डीव्हीव्ही एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. हा चित्रपट 1920 च्या दशकातील क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. हा मल्टीस्टारर पीरियड ड्रामा यापूर्वी 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

450 कोटींच्या बजेटमध्ये बनतोय 'आरआरआर'
'आरआरआर' हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. रिपोर्ट्सनुसार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सध्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सचे शूटिंग करत आहेत. 'बाहुबली' सारखी सुपरहिट सीरिज बनवणा-या राजामौलींचा 'आरआरआर' हा चित्रपट तब्बल 450 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार होत आहे.