आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खळबळजनक:अभिनेत्री अमिषा पटेलने बिहारच्या लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्यावर लावले गंभीर आरोप, म्हणाली - 'बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या औरंगाबादमध्ये प्रचार करताना अमीषा पटेल
  • अमिषा 26 ऑक्टोबर रोजी बिहारच्या औरंगाबादच्या ओबरा विधानसभेचे लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्या प्रचारासाठी गेली होती.

अभिनेत्री अमिषा पटेलने धक्कादायक खुलासा करत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेला असताना माझा बलात्कार आणि हत्या झाली असती. मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याचे अमिषाने सांगितले आहे. त्यांनी जबरदस्तीने आपला प्रचार करण्यास सांगितले. तसेच न केल्यास धमकीही दिल्याचा आरोप अमिषाने केला आहे.

अमिषा 26 ऑक्टोबर रोजी बिहारच्या औरंगाबादच्या ओबरा विधानसभेचे लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्या प्रचारासाठी गेली होती. यावेळी सनरुफ कारने रोड शो केला होता.

तिथे घडलेल्या घटनेसंदर्भात अमिषा म्हणाली, “मी एक पाहुणी म्हणून डॉ. प्रकाश चंद्रा यांच्याकडे गेली होती. मात्र, ते लोकांना ब्लॅकमेल करतात आणि धमकावतात. त्यांनी मला आणि माझ्या टीमला वाईट पद्धतीने धमकावले आणि गैरवर्तन केले. मी सायंकाळी मुंबईला परत आल्यानंतर देखील त्यांनी मला धमकी देणारे मेसेज आणि कॉल केले. तसेच माझ्याबद्दल चांगले बोला आणि 26 ऑक्टोबरला जे घडले त्याविषयी बोलू नका. त्यांनी मला ब्लॅकमेल करत पैसे देतो पण लोकांसमोर माझ्याविषयी चांगले बोल असे सांगितले.”

अमिषा पुढे म्हणाली, “माझी संपूर्ण टीमला मी ते म्हणतील त्याला हो म्हणण्यास सांगितले. तसेच त्यांचे फोन आले तर अगदी आदराने बोलत कट करा असंही सांगितले. कारण ती व्यक्ती एक ठग असून गुंडाप्रमाणे वागत होती. त्यामुळे ते माझ्यासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होतं.”