आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतचा पहिला स्मृतीदिन:अंकिता लोखंडेने SSR च्या स्मृतीप्रित्यर्थ घरी केले हवन, आदल्या दिवशी फोटो शेअर करत म्हणाली - 'अंतराने काही फरक पडत नाही...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिता लोखंडेने शेअर केलेल्या व्हिडिओत ती घरी हवन करताना दिसत आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज पहिला स्मृतीदिन आहे. त्याचे चाहते, कुटुंबातील सदस्य, मित्र आणि अनेक सेलेब्स सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान, सुशांतची पुर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिने सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त घरी हवन केले. पूजेचा एक व्हिडिओ अंकिताने आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केला आहे.

अंकिता लोखंडेने शेअर केलेल्या व्हिडिओत ती घरी हवन करताना दिसत आहे. सुशांतच्या आठवणीत तिने मेणबत्त्या आणि दिवा लावला आहे. अंकिता3 जून रोजी सोशल मीडियावरुन काही काळासाठी ब्रेक घेतला होता. एक पोस्ट शेअर करत अंकिताने आपण काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून दूर जात असल्याचे म्हटले होते. या फोटोसोबत तिने लिहिले होतं, 'हा निरोप नाहीये आपण पुन्हा भेटणार आहोत.' आता सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी ती सोशल मीडियावर परतली.

पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता म्हणाली, 'अंतराने काही फरक पडत नाही, कारण एक दिवस…'
अंकिता नेहमीच सुशांतच्या आठवणींना उजाळा देताना दिसते. रविवारी अंकिताने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याचे कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अंकिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती समुद्र किनाऱ्यावर उभी असलेली दिसत आहे. यावेळी रेड जॅकेट आणि लोअर असे साधेच कपडे परिधान केले होते. या फोटोमध्ये ढगांनी भरून आलेले आभाळ दिसत आहे तर अंकिता या भरलेल्या आभाळाकडे पाहताना दिसत आहे.

अंकिताने हा फोटो शेअर करताना त्याला खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले, 'अंतर किती आहे हे महत्त्वाचे नाही कारण शेवटी आपण सर्व एकाच आभाळाखाली उभे असतो.' या कॅप्शनमधून अंकिता सुशांतला खास मेसेज देत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

2016 मध्ये झाले होते अंकिता-सुशांतचे ब्रेकअप
अंकिता आणि सुशांत हे दोघेही ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळजवळ सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे 2016 मध्ये ब्रेकअप झाले होते.