आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपबीती:बॉबी देओलच्या 'आश्रम 2' मध्ये झळकलेल्या अभिनेत्री अनुप्रियाचा धक्कादायक खुलासा, वयाच्या 18 व्या वर्षी अध्यात्मिक गुरुनेच केले होते गैरवर्तन

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आश्रम'मध्ये साकारली फॉरेन्सिक एक्सपर्टची भूमिका

प्रकाश झाच्या 'आश्रम' आणि 'आश्रम 2' या वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री अनुपिया गोयनकाने आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका अध्यात्मिक गुरुनेच गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले आहे.

ई-टाइम्सशी बोलताना अनुप्रिया म्हणाली, "माझ्या कुटुंबाचा त्या बाबांवर खूप विश्वास होता. मीही त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली होती. त्याचे शब्द पटणारे असायचे. तो व्यावहारिक दिसत होता, परंतु मी 18 वर्षांची असताना त्याने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. या धक्क्यातून सावरायला मला बराच काळ लागला होता.'

पुढे ती म्हणाली, ''देवाचे आभार मानते, मी त्याला माझा फायदा घेऊ दिला नाही. मी त्याच्यापासून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्याने माझे शोषण करण्याचा प्रयत्न केला यावर माझा प्रथम विश्वास बसत नव्हता. मला हे स्वीकारण्यास खूप वेळ लागला'', असे ती म्हणाली.

'आश्रम'मध्ये साकारली फॉरेन्सिक एक्सपर्टची भूमिका
आश्रम या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने अध्यात्मिक गुरु बाबा निरालाची भूमिका साकारली होती. तर अनुप्रिया नताशा या फॉरेन्सिक एक्सपर्टची भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी
एका मुलाखतीत अनुप्रिया म्हणाली - 'फॉरेन्सिक एक्सपर्ट नताशाची डिटेक्टिव मेंटिलिटी असून ती फक्त डॉक्टरच नाही तर गुप्तहेरदेखील आहे आणि केस सोडवण्यात ती मदत करते. नताशा कायम सत्याची साथ देते.'

'पद्मावत'मध्ये झळकली होती
आश्रम व्यतिरिक्त, अनुप्रियाने 'पद्मावत', 'टायगर जिंदा है' सारख्या चित्रपटात काम केले आहे, तर 'क्रिमिनल जस्टिस' या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आणि तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली
होती.

बातम्या आणखी आहेत...