आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री अनुष्का शर्माने सोमवारी आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. आता अनुष्काती लूक अ लाइक अमेरिकन गायिका ज्युलिया माइकल्स हिने देखील कमेंट देताना अनुष्का आणि विराट यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने 2020 मध्ये गरोदर असल्याचे सांगितले होते, त्यावेळीही ज्युलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरुष्काचे अभिनंदन केले होते.
काही वर्षांपूर्वी ज्युलियाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर अनुष्काच्या चाहत्यांनी ज्युलियाला ती हुबेहुब अनुष्कासारखी दिसत असल्याचे सांगितले होते. यानंतर या दोघींची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावरही बरीच व्हायरल झाली होती. ज्युलियानेदेखील दोघींचा एक फोटो पोस्ट करत, "हाय अनुष्का शर्मा, आपण दोघी जुळ्या आहोत," असे म्हटले होते. यावर अनुष्काने उत्तर दिले, "OMG, हो, मी तुला आणि उर्वरित माझ्यासारख्या दिसणा-या 5 लोकांना शोधत होते."
OMG YES!! 😲 I've been looking for you and the remaining 5 of our dopplegangers all my life 😂 https://t.co/SaYbclXyXt
— Anushka Sharma (@AnushkaSharma) February 5, 2019
अनुष्काने शेअर केला मुलीचा पहिला फोटो
अलिकडेच अनुष्काने विराट आणि तिच्या लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सोबतच तिच्या बाळाचे नावदेखील जाहीर केल्याचे पाहायला मिळाले. “आमच्या मुलीने, वामिकाने आमचे आयुष्य एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे! अश्रू, हसू, काळजी, आनंद या सगळ्या भावना काही मिनिटांच्या कालावधीत आम्ही अनुभवल्या आहेत” या आशयाची पोस्ट अनुष्काने केली. सोबतच तिने सर्व चाहत्यांचे त्यांच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभारही व्यक्त केले. तर विराट कोहलीनेही या फोटोवर कमेंट करताना 'माझे संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये,' असे म्हटले.
11 जानेवारी रोजी 32 वर्षीय अनुष्काने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. विराट कोहलीने सोशल मीडियावरुन ही आनंदाची बातमी शेअर करताना आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असून तुम्ही आमच्या प्रायव्हीसाचा आदर कराल, असे म्हटले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.