आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:आयशा टाकिया आणि तिचे पती फरहान आझमी यांनी मुंबईत क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी दिले स्वतःचे हॉटेल 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फरहान यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली.

अभिनेत्री आयशा टाकिया आणि तिचे पती फरहान आझमीसुद्धा देशात कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. या दोघांनी दक्षिण मुंबईतील त्यांचे हॉटेल गल्फ बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ला क्वारंटाईन सेंटर तयार करण्यासाठी दिले आहे. फरहान यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली.

त्यांनी लिहिले की, 'गल्फ हॉटेल कायम स्टँडिंग ओवेशनसाठी पात्र आहे. कारण प्रत्येक वेळी संकटाच्या काळात ते उपयोगाला येते. 1993 च्या दंगलीत धारावी, प्रतिक्षा नगर व इतर भागातील लोक येथेच राहिले आणि आज कोरोना संकटाच्या काळात त्याचा अनेकांना उपयोग होतो. फरहान हे सपा नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे.'

  • सोनू सूदनेही दिले हॉटेल

अभिनेता सोनू सूदने कोराना व्हायरसच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी मुंबईतील जुहू येथील त्याच्या 6 मजली हॉटेलात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. कारण ते स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना व्हायरसची लढाई लढत आहेत. त्याच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे असे त्याचे म्हणणे आहे. 

  • शाहरुखने दिले ऑफिस

अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी क्वारंटाईन क्षमता वाढवण्यासाठी मुंबईतील त्यांचे चार मजली ऑफिस बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीला दिले आहे. महापालिकेने शाहरुख आणि गौरी खानचे आभार मानणारे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये महापालिकेने म्हटले होते, “आपली चार मजली कार्यालयीन इमारत ज्यामध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांसाठी गरजेच्या सर्व गोष्टी आहेत ती विलगीकरणासाठी देण्याची ऑफर दिल्याबद्दल शाहरुख आणि गौरी खानचे आभार”.

  • सचिन जोशीने दिले हॉटेल

वाइकिंग ग्रुपचे सीएमडी आणि अभिनेता-निर्माता सचिन जे. जोशीने पवई येथील ‘द बीटल’ हे हॉटेल बीएमसीला क्वारंटाईनच्या वापरासाठी दिले आहे. ते 36 खोल्यांचे आलिशान बुटिक हॉटेल आहे. येथे कोविड 19 मुळे संसर्गित झालेल्या विदेशातून परतलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जाऊ शकते.  

बातम्या आणखी आहेत...