आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री आत्महत्या प्रकरण:दाक्षिणात्य अभिनेत्री चित्राच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या, मालिकांमध्ये बोल्ड सीन दिल्याने नाराज होता पती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी हेमनाथवर चित्राला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा कामराज हिच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती हेमनाथला अटक केल्याचे वृत्त आहे. चित्राला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली हेमनाथला अटक करण्यात आली आहे. चित्रा गेल्या आठवड्यात चेन्नईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. चित्राच्या आईने हेमनाथने आपल्या मुलीची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला होता.

या कारणामुळे होता चित्रा आणि तिच्या नव-यात वाद
काही महिन्यांपूर्वीच चित्राचे लग्न हेमनाथसोबत झाले होते. काही मालिकांमध्ये चित्राने बोल्ड सीन दिल्याने हेमनाथ नाराज होता असे तपासात समोर आले आहे. “हेमनाथला तिने टीव्ही मालिकेत दिलेला सीन आवडला नव्हता. ज्या दिवशी चित्राचा मृत्यू झाला, त्यादिवशी त्याने दिला धक्का दिला होता,” अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हेमनाथची चौकशी सुरु होती. चित्राचे मित्र आणि सेटवरील सहकाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. पोलिसांनी हेमनाथवर चित्राला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

चेन्नईतील इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री 2.30 वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतला असल्याचे हेमनाथने पोलिसांना सांगितले होते. “रुममध्ये परत आल्यावर चित्रा अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. मात्र बराच वेळ परत न आल्यामुळे आपण दरवाजा ठोठावला. आतून काहीच आवाज आला नाही. त्यामुळे मी हॉटेल स्टाफकडून डुप्लिकेट चावीने दार उघडले. तेव्हा ती सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळली” असा जबाब हेमनाथने पोलिसांना दिला.

चित्राने 2013 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी अँकर म्हणून कारकीर्द सुरु केली. व्हीजे चित्रा म्हणून तिने मनोरंजन विश्वात नाव कमावले. सुरुवातीला तिने अनेक तामिळ टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले होते. विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांना आवडलेली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser