आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या घराबाहेर गोळीबार:अभिनेत्रीचा दावा - घराबाहेर तीनदा ऐकू आला गोळीबाराचा आवाज, म्हणाली - सुशांत प्रकरणातील वक्तव्यांमुळे कुणीतरी घाबरवण्याचा प्रयत्न केला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या घराबाहेर कुणीतरी गोळीबार केला.
  • कंगनाचा दावा - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलावरील टिप्पणीनंतर असे होणे हा केवळ योगायोग नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सतत न्यायाची मागणी करणार्‍या कंगना रनोट हिने आपल्या घराबाहेर तीनदा गोळीबार झाल्याचा दावा केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीची असल्याचे समजते. वृत्तानुसार, कंगनाच्या तक्रारीनंतर तेथे एक पोलिस पथक तैनात करण्यात आले होते, जे प्रत्येक येणा-या जाणा-याची चौकशी करत आहे.

मात्र, प्राथमिक तपासात कुल्लू पोलिसांना काहीही संशयास्पद घडल्याचा पुरावा मिळालेला नाही. तथापि, सुशांत प्रकरणातील अलीकडील राजकीय विधानांमुळे आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा कंगनाचा दावा आहे. खुद्द कंगनाने एका मुलाखतीत शुक्रवारी रात्री घडलेली घटना कथन केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना कंगना म्हणाली, "मी माझ्या बेडरूममध्ये होतो. रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजले असावेत. आमचे तीन मजल्यांचे घर आहे. मागे एक बाऊंड्री वॉल आहे ज्याच्या मागे एक सफरचंदाची बाग आहे. सर्वप्रथम मला रात्री साडेअकराच्या सुमारास पहिल्यांदा फटाक्यासारखा आवाज ऐकू आला. मला वाटले की हा फटाका असू शकेल. मग दुसरा शॉट झाला आणि मी सतर्क झाले, कारण हा आवाज बंदुकीच्या गोळीसारखा होता.

मनाली येथे सध्या टुरिज्म सीझन नाहीये. आत्ता येथे कोणतेही फटाके फोडणार नाहीत. तर मी सिक्युरिटी इन्चार्जला फोन करून विचारले काय झाले? त्याने कदाचित मुले असावीतअसे म्हटले. कुणी फटाके तर उडवत नाही ना, हे त्यांनी जाऊन पाहिले. पण तिथे कुणीही नव्हते.

आम्ही घरात पाच जण आहोत आणि सर्वांनी तो आवाज ऐकला. प्रत्येकालाच वाटले की हा बुलेटचा आवाज आहे. हा फटाक्यासारखा आवाज नव्हता. म्हणून आम्ही पोलिसांना फोन केला.

  • पोलिसांनी आल्यावर काय केले?

कंगनाने सांगितल्यानुसार, पोलिसांनी शंका व्यक्त केली वटवाघळांना पळवून लावण्यासाठी कुणी प्रयत्न केला असेल. कारण ते सफरचंदाची बाग उद्धवस्त करतात. दुस-या दिवशी सकाळी बागेच्या मालकाला बोलावून यासंदर्भात विचारणा करण्यात आली, मात्र त्यांनी रात्रीच्या वेळी असा प्रयत्न केला नसल्याचे सांगितले. पोलिस आता तपास करत असून आजूबाजूच्या लोकांचे जबाब घेत आहेत. रात्री तीन कॉन्स्टेबल कंगनाच्या घराबाहेर तैनात होते.

  • तो बुलेटचा आवाज होता याचा कंगनाला अंदाज कसा आला?

कंगनाने म्हटल्यानुसार, "माझ्या कर्मचार्‍यांनी सांगितले की त्यांनी बर्‍याच वर्षांपासून कोणालाही वटवाघळांना पळवून लावण्यासाठी गोळी चालवताना पाहिले नाही. विशेषतः मध्यरात्री. त्यामुळे तो बुलेटचाच आवाज होता, या निष्कर्षावर मी पोहोचले. मी आवाज ऐकला आणि मला खात्री झाली की हा बुलेटचा आवाज आहे. 8 सेकंदाच्या अंतरातून दोन शॉट्स झाले होते. हे माझ्या खोलीच्या अगदी जवळ घडले. असे वाटले की कोणीतरी बाऊंड्री वॉलच्या मागे होते.'

  • कंगनाला घाबरवण्यासाठी गोळी चालविण्यात आली होती?

कंगनाच्या म्हणण्यानुसार, तिच्या अलीकडील राजकीय विधानांमुळे एखाद्याने तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून ती हे सर्व करणे थांबवेल. ती म्हणते, "मला वाटतं माझ्या घरावर कुणीतरी पाळत ठेवत आहे. त्यांच्यासाठी येथे 7-8 हजार रुपयांत लोकांना हायर करणे मोठी गोष्ट नाही. ज्या दिवशी मी मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) मुलगा (आदित्य ठाकरे) यांच्याविरोधात विधान केले, त्याच दिवशी असे घडणे हा योगायोग असू शकत नाही, असे कंगनाचे म्हणणे आहे. लोक मला सांगत आहेत की आता माझे मुंबईतील जगणे कठीण होईल. बरं, मी मुंबईत नाही, पण ते येथेही हे सर्व करत आहेत. देशात काय गुंडगिरी सुरू आहे? सुशांतला याची भीती वाटली असावी. पण मी सतत प्रश्न उपस्थित करत राहीन, असे कंगना म्हणाली आहे.

  • आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कंगनाने काय म्हटले होते?

एका एन्टरटेन्मेंट न्यूज वेबसाईटने असा दावा केला आहे की सुशांतने मृत्यूच्या आदल्या रात्री पार्टी केली होती आणि त्यात एक प्रमुख व्यक्ती सामील झाली होती. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगना रनोटच्या टीमने ट्विटरवर लिहिले की, "सर्वांना माहित आहे, पण कुणीही त्याचे नाव घेणार नाही. करण जोहरचा सर्वात चांगला मित्र आणि जगातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांचा मुलगा, प्रेमाने ज्याला बेबी पेंग्विन म्हटले जाते', असे तिने म्हटले आहे. जर मी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले तर लक्षात असू त्या मी आत्महत्या केली नसेल, असेही ती म्हणाली आहे.

बातम्या आणखी आहेत...