आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीचे समर्पण:'जहां चार यार'च्या सेटवर जखमी झाली पूजा चोप्रा, जखमी असूनही चित्रीकरण सुरु ठेवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजाच्या ओठांना दुखापत झाली आहे.

'कमांडो' फेम पूजा चोप्रा तिच्या आगामी 'जहां चार यार' या चित्रपटाच्या सेटवर जखमी झाली आहे. दुखापत झाली असली तरी तिने चित्रपटाचे शूटिंग थांबवले नाही. चित्रपटाच्या सेटवर उपस्थित सूत्रांनी याबाबत माहिती दिली आणि सांगितले की तिच्या ओठांना यावेळी दुखापत झाली.

पूजाने चित्रीकरण पुन्हा सुरू केले

सूत्रांनी सांगितले की, "स्वरा भास्करसोबतचे तिचे एक हाणामारीचे दृश्य होते. या दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान पूजाच्या ओठांना चुकून दुखापत झाली. जखम खोल असूनदेखील पूजाने शूट थांबवले नाही. तिने पेन किलर घेऊन शूट पुन्हा सुरू केले." सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे शूटिंग धोक्यात आहे. अशा परिस्थितीत शूट इतर कोणत्याही कारणांमुळे थांबणार नाही, याची खबरदारी सर्वजण घेत आहेत. त्याचबरोबर कलाकारदेखील या गोष्टीची काळजी स्वत: घेत आहेत. पूजानेदेखील असे केले आणि जखमी असूनही चित्रपटाचे चित्रीकरण सुरु ठेवले.

विनोद बच्चन करत आहेत चित्रपटाची निर्मिती

पूजा चित्रपटाच्या शूटिंगसाठी 8 एप्रिलला गोव्यात गेली होती. सध्या, तिचे 20 ते 22 दिवसांचे शूट बाकी आहे. यापूर्वी लखनऊमध्ये चित्रपटाचे वेळापत्रक पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत तिने शूटिंग थांबवले असते तर चित्रपटाचा संपूर्ण सेटअप बिघडला असता. त्यामुळे तिने सध्या स्वतःच्या दुखापतीकडे दुर्लक्ष केले आहे. विनोद बच्चन निर्मित हा चित्रपट नेटफ्लिक्स रिलीज होणार असून कमल पांडे त्याचे दिग्दर्शन करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...