आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये कोरोना:अभिनेत्री दीपिका पदुकोणला कोरोनाची लागण, आईवडील आणि बहिणीलाही झाला आहे संसर्ग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अद्याप दीपिकाच्या प्रकृतीविषयी जास्त माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासह बंगळुरु येथे आहे. यापूर्वीच तिच्या आईवडिलांसह धाकट्या बहिणीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बंगळुरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आई उज्जला आणि धाकटी बहीण अनिशा या होम क्वारंटाइन आहेत. दीपिका यांच्यासोबतच घरी असल्याचे सूत्रांकडून समजते.

अद्याप दीपिकाच्या प्रकृतीविषयी जास्त माहिती समोर आलेली नाही. दीपिका आणि रणवीर मागील महिन्यात मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले होते. हे दोघेही दीपिकाच्या आईवडिलांच्या घरी एकत्र वेळ घालवण्यासाठी रवाना झाले होते.

रुग्णालयात सुरु आहे दीपिकाच्या वडिलांवर उपचार
प्रकाश पदुकोण यांचे मित्र विमल कुमार यांनी सांगितल्यानुसार, प्रकाश आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसली. जेव्हा त्यांची चाचणी झाली तेव्हा त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या सगळ्यांनी स्वतःला आयसोलेट केले होते. मात्र आठवड्याभरानंतरही प्रकाश यांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता ते ठिक असून पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...