आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये ड्रग्जची चौकशी:नार्कोटिक्स ब्युरो याच आठवड्यात दीपिका पदुकोणची चौकशी करणार, आज तिच्या मॅनेजरला बोलावले; रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीचा आज अखेरचा दिवस

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आता दररोज नवे खुलासे होत आहेत. सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांच्यानंतर आता दीपिका पदुकोणचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले आहे. दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यातील ड्रग चॅट समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने आज करिश्माला चौकशीसाठी बोलावले आहे. यासह करिश्माची वरिष्ठ आणि रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साह हिचीदेखील आज एनसीबीच्या ऑफिसमध्ये चौकशी सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच आठवड्यात दीपिकाला देखील चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. दोघींमधील ड्रग्ज चॅट व्हायरल झाले आहेत.

  • रियाची न्यायालयीन कोठडी आज संपणार

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज (मंगळवार) पूर्ण होणार आहे. रियाला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण झाल्यानंतर रियाला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. आज रियाला न्यायालयात हजर करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसंच जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

रियाला अटक झाल्यानंतर तिने दोन वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यावेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता.

जया साहाची सोमवारी चार तास झाली होती चौकशी

दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि रियाची मॅनेजर जया साह क्वान या एकाच कंपनीत काम करतात. ही कंपनी सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरवते. करिश्मा जयाची ज्युनिअर आहे. एनसीबीने आज पुन्हा जया साह हिला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी सोमवारी 4 तास तिची चौकशी झाली होती. करिश्मा आणि जया व्यतिरिक्त सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी आणि क्वानचे डायरेक्टर ध्रुव यांचीही आज चौकशी केली जाईल.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावे समोर आली आहेत. एनसीबीला एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट मिळाले आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचे समोर आले आहे.

जया साहच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीने चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली.

बातम्या आणखी आहेत...