आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी संकटात:32 वर्षीय अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक; पोर्न व्हिडिओ बनवून वेबसाइटवर अपलोड करण्याचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील वर्षी 'गंदी बात' सीरीजमध्ये दिसली होती गहना

अभिनेत्री आणि मॉडल गहना वशिष्ठला मुंबईच्या गुन्हे शाखेने प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. पोर्न व्हिडिओ बनवणे आणि तो आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचा तिच्यावर आरोप आहे. आज (रविवारी) तिला मुंबईच्या एका कोर्टात हजर करण्यात आले. तीन लोकांनी आपल्यावर पोर्न चित्रपटात काम करण्याचा दबाव टाकत असल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गहनाने 87 पोर्न व्हिडिओ बनवले

एका न्यूज पोर्टलशी संवाद साधताना मुंबई पोलिसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गहनाने 87 पोर्न व्हिडिओ बनवले आहेत आणि ते तिच्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत. ते पाहण्यासाठी सशुल्क सदस्यता (पेड सब्सक्रिप्शन) आवश्यक आहे, जी 2000 रुपये ठेवली गेली आहे.

'गंदी बात' मध्ये दिसली होती गहना

32 वर्षीय गहनाचे जन्मनाव वंदना तिवारी आहे. तिने भोपाळमधून रोबोटिक सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. गहना 'स्टार प्लस' वरील 'बहनें' मालिकेत दिसली होती. 2012 मध्ये गहनाने मिस आशिया बिकने कॉन्टेस्ट जिंकली होती. याशिवाय मागील 6 वर्षांमध्ये तिने 30 पेक्षा अधिक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे. गहना गेल्यावर्षी अल्ट बालाजीची सीरीज 'गंदी बात' आणि उल्लू अॅपच्या शोमध्ये दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...