आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर हंसिका मोटवानीचा मिस्ट्री मॅन आला समोर:आयफेल टॉवरसमोर साहिलने केले प्रपोज, अभिनेत्रीने शेअर केले रोमँटिक PHOTOS

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री हंसिका मोटवानी मागील काही दिवसांपासून लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. हंसिका येत्या 4 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये डेस्टिनेश वेडिंग करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप हंसिकाच्या कुटुंबाकडून याबाबत अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण हंसिकाने आज तिच्या लग्नाच्या चर्चांना दुजोरा दिलाय. हंसिकाने तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेस पार्टनर सोहेल कथुरियाबरोबरच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

फिल्मी स्टाइलने साहिलने केले हंसिकाला प्रपोज
सोहेलने अगदी फिल्मी स्टाइलने हंसिकाला प्रपोज केले. सोहेलने पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून रोमँटिक अंदाजात हंसिकाला लग्नाची मागणी घातली.

हंसिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर करत त्याला 'Now&Forever' असं कॅप्शन दिले आहे. सोहेल ब्लॅक सूटमध्ये हँडसम दिसतोय, तर हंसिकाने स्ट्रॅपलेस व्हाइट ड्रेस परिधान केला आहे.

सेलिब्रिटींसह चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
हंसिकाने हे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यत सर्वजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

वरुण धवन, अनुष्का शेट्टी, करण टॅकर, पीव्ही सिंधू आणि शिवालिका ओबेरॉय यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

हंसिका-सोहेल जयपूरमध्ये करणार आहे लग्न

हंसिकाचे लग्न अतिशय शाही पद्धतीने होणार असून त्यासाठी तिने जयपूरच्या 450 वर्षे जुन्या किल्ल्याची निवड केली आहे. मुंडोटा किल्ल्यात हंसिकाच्या लग्नाची सर्व तयारी सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसिका आणि सोहेलचे लग्न अतिशय शाही पद्धतीने होणार आहे. जयपूरच्या पॅलेसमध्ये 2 डिसेंबरला सूफी नाईट, 3 डिसेंबरला मेंदी आणि संगीत आणि 4 डिसेंबरला लग्नाचे विधी होतील. या सर्व सोहळ्याची तयारी आतापासून सुरू झाली आहे. मात्र, अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कोण आहे हंसिकाचा जोडीदार सोहेल?
हंसिकाच्या लाइफ पार्टनरबद्दल आतापर्यंत फारशी माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल कथुरिया असे त्याचे नाव असून तो एक व्यावसायिक आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोहेल दीर्घकाळापासून हंसिकाचा बिझनेस पार्टनर आहे. दोघेही 2020 पासून इव्हेंट प्लॅनिंग कंपनी चालवत आहेत. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले, 2 वर्षांच्या नात्यानंतर अखेर दोघेही लग्न करणार आहेत.

हंसिकाचे फिल्मी करिअर
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर हंसिका लवकरच 'राउडी बेबी' या तामिळ चित्रपटात दिसणार आहे. हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 'शका लाका बूम-बूम' सारख्या टीव्ही शोद्वारे तिने टीव्ही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. एवढेच नाही तर 'कोई मिल गया' या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर हंसिका 'आपका सुरूर' या चित्रपटात गायक हिमेश रेशमियासोबत मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपटात हंसिका अचानक मोठी दिसल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते. हंसिका साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव असून तिचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात.

बातम्या आणखी आहेत...