आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. जयपूरमधील मुंडोता फोर्ट येथे शनिवारी पोलो मॅचचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान हंसिका आणि सोहेल पांढऱ्या ड्रेसमध्ये विंटेज कारमधून पोलो ग्राउंडवर पोहोचले. जिथे पोलो मॅच पाहिल्यानंतर दोघांनीही फॅमिली मेंबर्स आणि मित्रांसोबत जबरदस्त डान्स केला.
तत्पूर्वी शुक्रवारी रात्री सुफी नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लग्न समारंभात आलेले खास पाहुणे राजस्थानी लोककलाकारांच्या तालावर आनंद लुटताना दिसले.
पांढऱ्या आणि गुलाबी थीमवर पोलो मॅच फंक्शन
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास पोलो सामन्यादरम्यान झालेल्या हाय टी पार्टीची थीम गुलाबी आणि पांढरी होती. यामध्ये सर्वजण गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होते. हंसिका आणि तिचा भावी नवरा पांढऱ्या कपड्यात होते. तसेच सर्व पाहुणे गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसले.
नवऱ्यासोबत केला डान्स
पोलो सामन्यादरम्यान हाय-टी पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व पाहुण्यांनी वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेतला. यासोबतच डान्स पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हंसिकाने तिच्या भावी नवऱ्यासोबत डान्स केला.
हंसिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स गेल्या आठवड्यापासून सुरू झाले
हंसिकाच्या लग्नाच्या विधी गेल्या आठवड्यात मुंबईत माता की चौकीपासून सुरू झाल्या. नुकताच तिच्या हातावर सोहेलच्या नावाची मेंदी काढण्यात आली. हंसिकाने काही दिवसांपूर्वीच आपल्या गर्ल गँगसोबत बॅचलर पार्टीही साजरी केली होती. त्यांनी ही पार्टी ग्रीसमध्ये साजरी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.