आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदर्स डे:हिमानी शिवपुरींनी पतीच्या निधनानंतर एकटीने केला मुलाचा सांभाळ, म्हणतात - माझ्या मुलाने प्रत्‍येक टप्‍प्‍यावर पाठिंबा दिल्‍यामुळे मी हा प्रवास यशस्‍वीपणे पार करू शकले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1995 मध्ये झाले होते हिमानी शिवपुरी यांच्या पतीचे निधन

आई ही आपले विश्‍व, आधारस्‍तंभ व पहिली जिवलग मैत्रीण आहे. ती आपल्‍याला प्रोत्‍साहन देते, मार्गदर्शन करते, आपल्‍याला मार्ग दाखवते आणि उंच भरारी मारण्‍यास प्रेरित करते. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे ती नेहमीच आपल्‍या पाठीशी असते. यंदा मातृ दिनानिमित्त छोट्या पडद्यावरील 'हप्‍पू की उलटन पलटन' या मालिकेत कटोरी अम्‍माची भूमिका साकारणा-या अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी त्यांच्या मुलासोबतच्‍या खास नात्‍याबाबत सांगितले आहे.

हिमानी यांनी हम आपके है कौन, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांना एकुलता एक मुलगा असून कट्यायन हे त्याचे नाव आहे.

मातृ दिनाच्या निमित्ताने हिमानी शिवपुरी म्‍हणाल्‍या, ''माझा मुलगा माझे सर्वस्‍व आहे. आम्‍ही एका टीमसारखे आहोत. आमच्‍यामधील नाते अद्वितीय व अत्‍यंत खास आहे. मी मुंबईला आले आणि माझा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाल्‍यानंतर माझ्या पतीचे निधन झाले. अशा आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये माझा मुलगा कट्यायन माझ्यासाठी प्रबळ आधारस्‍तंभ होता. त्‍याने माझ्याकडे पाहिले आणि म्‍हणाला 'आई, मला तुझ्यासोबत मुंबईला यायचे आहे'.

हिमानी पुढे सांगतात, 'मला आजही माझ्यासाठी त्‍याच्‍या डोळ्यामध्‍ये दिसलेली निरागसता व काळजी आठवते. तो मला विश्‍वाच्‍या अव्‍वलस्‍थानी असल्‍याची भावना देतो. मातृत्‍वाचा अनुभव अद्भुत राहिला आहे. तो माझ्या जीवनातील प्रत्‍येक चढ-उतारामध्‍ये सोबत राहिला आहे. प्रत्‍येक दिवस त्‍याच्‍यासोबत खूप खास असतो आणि यामुळे माझे जीवन आनंदमय झाले आहे. एकटी कमावती माता असणे खूपच आव्‍हानात्‍मक आहे, पण माझ्या मुलाने प्रत्‍येक टप्‍प्‍यावर पाठिंबा दिल्‍यामुळे मी हा प्रवास यशस्‍वीपणे पार करू शकले. तो अत्‍यंत समंजस व सहाय्यक आहे. मला त्‍याच्‍यासारखा मुलगा असल्‍यामुळे धन्‍य वाटते.'

'मातृ दिनानिमित्त माझी इच्‍छा आहे की, सर्व एकट्या असलेल्‍या मातांना प्रचंड शक्‍ती व धैर्य मिळो. हे सोपे नाही, पण आपल्‍या मुलांना चांगले व्‍यक्‍ती बनताना पाहून मन आनंदाने भरून येते. एकट्या असलेल्‍या माता या आपल्‍या मुलांना आनंदी ठेवण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या सर्व गरजा पूर्ण करण्‍यासाठी महिलांना कराव्‍या लागणा-या त्‍यागाच्‍या परिपूर्ण आदर्श आहेत. त्‍यांचा उत्‍साह व धैर्याला सलाम!', असे हिमानी शिवपुरी म्हणाल्या.

1995 मध्ये झाले होते पतीचे निधन
हिमानी शिवपुरी यांनी मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावरही बरेच काम केले आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील सिमरनच्या बुवाच्या भूमिकेतून त्यांना खूप लोकप्रियता मिळाला. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी हिमानी यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन त्यांच्याशिवाय पूर्ण करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...