आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनई चौघड्यांचे सूर:काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी; 30 ऑक्टोबरला प्रियकर गौतमसोबत घेणार सप्तपदी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काजलने इंस्टाग्रामवर मेहंदी सोहळ्याचा फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत ती विवाहबद्ध होणार आहे. तिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबर रोजी मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

काजलने इंस्टाग्रामवर मेहंदी सोहळ्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काजलच्या हातावर मेहंदी आहे आणि ती हसताना पोज करताना दिसत आहे. काजलने हिरव्या रंगाचा ड्रसे परिधान केला आहे.

यापूर्वी बुधवारी, काजलने बहिण निशासोबत पायजमा पार्टी करतानाचे काही फोटो शेअर केले होते. यासह तिने सिंगल स्टेट्सला बाय-बाय म्हटले होते. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “मिस अग्रवाल म्हणून शेवटचे दोन दिवस, प्रत्येक गोष्टीत माझी पार्टनर निशा अग्रवालसह.” या फोटोत काजल धाकटी बहीण निशासह दिसतेय.

  • 6 ऑक्टोबर रोजी दिली होती लग्नाची बातमी

काजलने 6 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून चाहत्यांना लग्नाची बातमी दिली होती. तिने लिहिले होते, ''मी होय म्हटलंय... मला हे सांगताना आनंद होतोय की, येत्या ३० ऑक्टोबर रोजी मी गौतम किचलू लग्न करतेय. आमच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. या करोनाच्या काळात आपला आनंद काहीसा कमी झाला असला तरी, आम्ही दोघं आयुष्याची नवी सुरुवात करण्यास उत्सुक आहोत. आजपर्यंत तुम्ही मला जे प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. नवीन प्रवासाला सुरुवात करताना तुमचा आशिर्वाद कायम राहु द्या', असे काजलने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

View this post on Instagram

♾🙏🏻

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on Oct 5, 2020 at 10:56pm PDT

  • गौतम किचलू कोण आहे?

रिपोर्ट्सनुसार, गौतम किचलू हा एक व्यवसायिक असून तो इंटेरिअर डिझाईन आणि होम डेकोर सजावटीशी संबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'डिसर्न लिव्हिंग'चा मालक आहे. तर काजल 'सिंघम', 'स्पेशल 26', 'मगधीरा' सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.