आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये कंगनाला 15 वर्षे पूर्ण:शाहरुख खानसोबत केली कंगनाने स्वतःच्या करिअरची तुलना, म्हणाली - ते कॉन्व्हेंटमध्ये शिकले होते आणि मला इंग्रजीचा एक शब्दसुद्धा येत नव्हता

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 वर्षांपूर्वी ‘गॅंगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

अभिनेत्री कंगना रनोटला आज (बुधवारी) बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिच्या करिअरमधील पहिला चित्रपट 'गँगस्टर' 28 एप्रिल 2006 रोजी प्रदर्शित झाला होता. कंगनाने या खास दिवसाचे औचित्य साधत सोशल मीडियावर एक स्पेशल नोट शेअर केली आहे. या नोटमध्ये तिने आपल्या करिअरची तुलना बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या करिअरशी केली आहे. या पोस्टसह कंगनाने तिचा 15 वर्षापूर्वींचा आणि अलीकडच्या काळातील फोटोचा कोलाजदेखील शेअर केला आहे.

  • शाहरुख आणि माझी सर्वात मोठी यशोगाथा

कंगनाचे ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. '15 वर्षांपूर्वी आज ‘गँगस्टर’ प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान जी आणि माझी आतापर्यंतची सर्वात मोठी यशोगाथा आहे. पण शाहरुख हे दिल्लीचे होते, त्यांनी कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेतले होतं आणि त्यांचे आई-वडील हे चित्रपटसृष्टीत सक्रिय होते, मला मात्र इंग्रजीचा एक शब्दसुद्धा येत नव्हता, शिक्षण नाही, हिमाचल प्रदेशमधील एका दुर्गम गावातून आले होते,' अशा आशयाची पोस्ट शेअर करत कंगनाने शाहरुख खान आणि तिच्या करिअरची तुलना केली आहे.

  • मला दररोज जगण्यासाठी लढाई करावी लागते

कंगना पुढे म्हणाली, 'माझ्यासाठी प्रत्येक पावलावर लढाई होती. प्रत्येक पाऊल म्हणजे माझे वडील आणि आजोबांपासून सुरु होणारी लढाई, ज्यांनी माझे आयुष्य हे दयनीय बनवले होते. आणि तरीही 15 वर्षांनंतर यशस्वी झाल्यानंतरही दररोज जगण्यासाठी लढाई करावी लागते, पण हे योग्य आहे. यासाठी सगळ्यांचे आभार,' असे कंगना म्हणाली आहे.

  • कंगनाने 15 वर्षांच्या करिअरमध्ये 4 राष्ट्रीय पुरस्कार केले आपल्या नावी

अनुराग बासू दिग्दर्शित ‘गँगस्टर’मध्ये कंगनासह इमरान हाश्मी आणि शायनी आहुजा मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी केली होती. कंगनाने तिच्या 15 वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. 'फॅशन', 'क्वीन, 'तनु वेड्स मनु' आणि 'मणिकर्णिका' / 'पंगा' या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता कंगना लवकरच 'थलायवी', 'धाकड' आणि 'तेजस' मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...