आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धाकड':चित्रपटातील नवीन लूक शेअर करत कंगनाने देवी भैरवीसोबत केली स्वतःची तुलना, नेटक-यांनी केली टीका, म्हणाले - तू फक्त अभिनेत्री, देव नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना म्हणते - अग्नि हे मृत्यूची देवी भैरवीचे रूप आहे

अभिनेत्री कंगना रनोट सध्या तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दरम्यान, सोमवारी तिने चित्रपटातील तिच्या लूकचे दोन नवीन फोटो शेअर केले आहे. इतकेच नाही तर हे फोटो शेअर करत तिने स्वतःची तुलना देवी भैरवीसोबत केली आहे. या छायाचित्रांमध्ये कंगना हातात रायफल घेऊन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसते. या चित्रपटात ती एजंट अग्निची व्यक्तिरेखा साकारतेय.

अग्नि हे मृत्यूची देवी भैरवीचे रूप आहे
कंगना रनोटने हे फोटो शेअर करत लिहिले, "ते तिला अग्नी म्हणतात. एक शूर धाकड म्हणतात. पण माझ्या मते ती मृत्यूची देवी भैरवीचे रुप आहे. 'धाकड'..." अशा आशयाचे कॅप्शन कंगनाने दिले आहे. या कॅप्शनवर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

तू फक्त अभिनेत्री आहेस, देव नाही
कंगनाने तिचे दोन्ही फोटो शेअर करताना तिची तुलना देवी भैरवीसोबत केली आणि याचमुळे कंगनावर आता टीका केली जात आहे. एका नेटक-याने लिहिले, "प्रत्येक गोष्टीत देवाला जोडणे आवश्यक आहे का? तू फक्त एक अभिनेत्री आहेस, देव नाही, स्वत:ची तुलना देवाशी करू नको.' आणखी एका यूजरने म्हटले, "तिला हिंदूंच्या भावनांमधून पैसे कमवायचे आहेत, त्याचा धर्माशी काही संबंध नाही."

अ‍ॅक्शन सीनवर खर्च होणार आहेत 25 कोटी या चित्रपटातील एका अ‍ॅक्शन सीनवर तब्बल 25 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. स्वतः कंगनाने सोशल मीडियावर रिहर्सलचा व्हिडिओ शेअर करताना हा दावा केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कंगना म्हणतेय, ‘मी असा कोणताही दिग्दर्शक पाहिला नाही जो रिहर्सल्ससाठी इतका वेळ आणि महत्त्व देतो. चित्रपटातील सर्वात मोठा अ‍ॅक्शन सीन शूट करत आहोत. पण या सीनसाठी केलेली तयारी पाहून मला आश्चर्य वाटले. मला खूप काही शिकायला मिळत आहे. या एका अ‍ॅक्शन सीनसाठी 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जात आहे,’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

दिवाळीत प्रदर्शित होणार आहे 'धाकड'

रजनीश घई दिग्दर्शित ‘धाकड’ हा चित्रपट यावर्शी दिवाळी मुहूर्तावर 1 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिव्या दत्ता आणि अर्जुन रामपालसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात कंगना इंटेलिजेंस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिचा आणखी एक चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थलायवी असे या चित्रपटाचे नाव असून यात तिने तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका वठवली आहे.

'धाकड' नंतर कंगना 'तेजस'च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. तिने 'अपराजित अयोध्या', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर आधारित अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. याशिवाय आणखी एका आगामी चित्रपट कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...