आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:कंगना रनोट म्हणाली -  'घराणेशाही आणि मुव्ही माफिया व्यतिरिक्त सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे नाइट शिफ्टमध्ये काम करणे'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'धाकड' 1 ऑक्टोबरला होणार रिलीज

अभिनेत्री कंगना रनोट सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ते कायमच कोणत्याही विषयावर रोखठोक मत व्यक्त करत असते. आता कंगनाने आपल्या एका नवीन पोस्टमधून कलाकारासाठी सगळ्यात भयानक गोष्ट कोण असते, त्याचा खुलासा केला आहे. याशिवाय तिने आपल्या आगामी 'धाकड' चित्रपटाचे पोस्टरही शेअर करुन चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट येत्या 1 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे नाईट शिफ्टमध्ये काम करणे

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "घराणेशाही आणि मुव्ही माफीया यांच्या व्यतिरिक्त कलाकार असण्याची सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे नाईट शिफ्टमध्ये काम करणे आहे. जेव्हा सुर्योदय होतो तेव्हा आपण झोपतो त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलतात. सुरुवातीला रात्री काही दिवस मला भूक लागत नव्हती आणि मन सारखे विचलित होत होते. आता माझ्या शरीराला याची सवय होईल याचीच वाट बघतेय,' असे कंगना म्हणाली आहे. सोबतच तिने ट्विटरवर काय बातमी आहे?, असेही विचारले आहे.

'धाकड' 1 ऑक्टोबरला होणार रिलीज

'धाकड'चे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले, "ती निर्भय आणि उग्र आहे, ती एजंट अग्नी आहे. भारताचा पहिला महिला अॅक्शन थ्रिलर 'धाकड' 1 ऑक्टोबर 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल."

कंगना सध्या मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 'धाकड' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अर्जुन रामपाल देखील मुख्य भूमिकेत आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात कंगना एका महिला गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अर्जुन हा खलनायक बनला आहे, जो वेश्या व्यवसायाबरोबरच शस्त्रे व ड्रग्जची तस्करी करतो.

कंगनाचा 'थलायवी' लवकरच होणार प्रदर्शित
'धाकड'पूर्वी कंगनाने तेजस या चित्रपटाच्या काही शेड्युलचे चित्रीकरण केले होते. तेजसमध्ये ती एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी कंगना थलायवीच्या चित्रीकरणात बिझी होती. ‘थलाइवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका करण्यासाठी कंगनाने आपले वजन सुमारे 20 किलोने वाढवले होते. हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...